नांदगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
नाशिक

नांदगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नांदगाव | प्रतिनिधी 

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत मुलीच्या नात्यातीलच व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे एका अल्पवयीन मुलीसोबत नात्यातीलच एका नराधमाने अनैतिक संबंध ठेवले. वेळोवेळी तिच्यावर अनैतिक अत्याचार केले.

मुलीला पोटात दुखत असल्याने तिच्या आजीने ग्रामीण रुग्णालयात दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता सदर मुलगी पाच महिन्याची
गर्भवती असल्याचे आढळून आले आहे.नांदगाव पोलिसांत मुलीच्या आजीने एका नातेसंबंध असलेल्या युवकांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांत लैंगिक अत्याचार व पोस्को प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक पीएसआय परशुराम दळवी करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com