नांदगाव। Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा असलेल्या गाड्यांचे थांबे काढून घेणे व रेल्वेचे फाटक पूर्वसूचना न देता बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात सोमवार (दि. ४) पुकारलेल्यां नांदगाव बंद कडकडीत पाळण्यात आला.

यावेळी शहरातील गांंधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी बोलताना सांगितले की,गेल्या महिन्यापासून नांदगाव येथे थांबणाऱ्या सात ते आठ रद्द करण्यात आले आहेत.मुंबई, नाशिक, पुणे येथे कसा प्रवास करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोज सहाशे ते साडे सहाशे प्रवासी प्रवास करतात. मनमाड, नाशिक रेल्वे गाड्या थांबतात. हा निर्णय राज्य शासनाची नसून हा निर्णय केद्रांंनी घेतला पाहिजे होता.राज्य शासनाचा निर्णय असता तर मुख्यमंत्र्यांना भेटून हा निर्णय मार्ग लावला असता ही जबाबदारी केद्रांंची असून आंदोलना शिवाय पर्याय नाही. रेलरोको, आदी आंदोलने लोकशाही मार्गाने करण्यात येतील.

असा इशाराही आमदार कांदे यांनी दिला आहे.यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा रेल्वे स्थानकाच्या वळविण्यात आला. यावेळी रेल्वे स्थानक अधिक्षक मिना निवेदन देण्यात आले. यावेळी आम्ही नांदगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रेल्वे सुरक्षाबल, पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नांदगाव बंद ठेवण्याचा निर्णयाला आम्ही नांदगावकर कृती समितीने आवाहनाला नांदगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन,व्यापारी संघटना, किराणा असोसिएशन, प्रवासी संघटना, जेष्ठ नागरिक संघटना, शहरातील शैक्षणिक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, आदींंना नांदगाव बंदला पाठिंबा दर्शविला होता. बंद काळात अत्यावश्यक सेवा, दैनंदिन ओपीडी बंद ठेवण्यात आल्या होत्या.