नांदगाव आठवडे बाजारात नियम धाब्यावर

नांदगाव आठवडे बाजारात नियम धाब्यावर

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

येथील नगरपरिषद प्रशासनाने (municipal administration) शहरात आठवडे बाजार (Weekly market) भरविण्यास बंदी घातली असतांनाही गुरूवारचा आठवडे बाजार भरला आणि खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी करत करोनाच्या (corona) सुरक्षा नियमांना (Safety regulations) हरताळ फासला.

ओमायक्रॉन (omicron) विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी अधिकारी वर्गाला केलेल्या आहेत. त्यानुसार नांदगाव (nandgaon) नगरपरिषदेने सोशल मीडिया (social media) व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांसह व्यावसायिकांना गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि नागरिकांनी कालच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शासकीय आदेश (Government order) धाब्यावर बसवले गेले.

शुक्रवारची मकर संक्रांत (Makar Sankrant) आणि दैनंदिन गरजेच्या वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीचौक, महात्मा फुले चौक आदी भागात भरविलेल्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. सुरक्षित अंतराचा बोजवारा उडाला. व्यवसायिकांनी बाजारपेठेत दुकाने थाटल्याची माहिती समजल्यावर नगरपरिषदेच्या पथकाने बाजारपेठेतून व्यावसायिकांना हुसकावले तसेच विनामास्क (mask) फिरणार्‍यांना समज दिली.

तथापि पालिकेचे पथक बाजारातून माघारी फिरल्यावर व्यावसायिकांनी पुन्हा आपली दुकाने थाटली. नागरिकांनीही खरेदीसाठी पुन्हा गर्दी केली. मकर संक्रांतीच्या सण बाजार असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी बाजारात होती. दरम्यान, करोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करत सैराट झालेल्या जनतेला करोना नियमांचे पालन करण्यासाठी तालुका प्रशासन, नगरपरिषद, पोलीस यंत्रणेेने अ‍ॅक्शन मोडवर येण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com