नांदगावला 5 ग्रामपंचायती बिनविरोध

मनधरणीत यशापयश, 580 जणांची माघार
नांदगावला 5 ग्रामपंचायती बिनविरोध

नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी, आमिषाचे गाजर अशा सर्व गोधळांत अखेर अर्ज मागे घेण्याची वेळही संपली. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचा तालुकाभर धुराळा उडणार आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सख्खे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत. तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

नांदगाव तालुक्यातील कोंढार जवळकी, बाणगांव खुर्द, मांडवड, मोरझर, ग्रामपंचायतींची माघारीच्या दिवशी बिनविरोध निवड झाली. नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू होती. नांदगाव तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 193 वॉर्डांतून 967 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

माघारीच्या दिवशी 580 जणांना माघार घ्यावी लागली. 123 जण बिनविरोध निवडून आले. अनेक पक्षांनी व स्थानिक पातळीवर नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश तर काही ठिकाणी यश आले नाही.

ग्रामपंचायतनिहाय आकडेवारी

अनकवाडे -18,अस्तगाव-18, आमोदे- 19, एकवई-11, कर्‍ही-17,कळमधरी-20, कासारी-21, कुसुमतेल-8, खिर्डी-17, गंगाधरी-19, गोंडगाव-14, चांदोरा-16, चिंचविहीर -13, जळगाव खुर्द-18, जळगाव बुद्रुक-24, जातेगांव-39, टाकळी बुद्रुक -15, ढेकूखुर्द -22, तांदूळवाडी-8, दहेगांव-13, धोटाणे बुद्रुक -14, नवे पंझन-14, नांदूर-15, न्यायाडोंगरी- 54, परधाडी-19,

पांझनदेव-15, पानेवाडी-19, पिंप्राळे-16, पिंप्रीहवेली-21, पोखरी-15, बाबुळवाडी -15

बिरोळे-9, बेजगांव-17, बोलठाण-31 भालूर -22, भौरी-14, मळगांव-12, , माणिकपुंज-16, माळेगाव-15, मोहेगाव-19, रणखेडा-15, रोहिले -13

बुद्रुक - लोहशिंगवे-18, वंजारवाडी-14, वडाळी खुर्द- 11, वडाळी बुद्रुक-20, वाखारी-19, वेहळगाव-19.

सटाणे-9, साकोरा-51, सावरगांंव-14, सोयगांव-13,

हिगणेदेहरे-12 हिसवळ खुर्द-17 एकूण- 967 उमेदवार रिंगणात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com