घोटी : नांदडगाव ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

मारहाणीत चार तोळ्याची चैन गहाळ
घोटी : नांदडगाव ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव- नांदडगाव ग्रामपंचायत सदस्यास मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

उमेश खातळे असे या सदस्याचे नाव आहे. उमेश हे काल सायंकाळच्या सुमारास घरी जात स्थानिक चौघांनी मारहाण केली. या झटापटीत उमेश खातळे यांचे चार तोळे सोन्याची चैन गहाळ झाली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व नांदडगाव सांजेगाव ग्रुप ग्रामपंचायत चे सदस्य आहे. दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास उमेश खातळे हे विकासकामांची पाहणी करण्यासाठी नांदडगाव येथे आले असताना मारुती मंदिराजवळ ही घटना घडली.

याबाबत उमेश खातळे यांच्या फिर्यदिवरून घोटी पोलिसांनी पाच संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुहास गोसावी करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com