नाना पटोलेंचा भाजपला सवाल; म्हणाले, नाशिक पदवीधरमध्ये...

नाना पटोलेंचा भाजपला सवाल; म्हणाले, नाशिक पदवीधरमध्ये...

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा (Nashik Graduate Constituency) प्रचार जोरात सुरु झाला असून महाविकास आघाडीने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत आपला उमेदवार दिला नसल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पटोले आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाशिक पदवीधरमध्ये उमेदवार न दिल्याने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

यावेळी ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा ही काँग्रेसची आहे. मात्र या ठिकाणी पक्षाला धोका मिळाला. दोन एबी फॉर्म देऊनही सगळं गणित फिरलं. मात्र माझा एक सर्वांना सवाल आहे की, या मतदारसंघात भाजपने उमेदवार का दिला नाही. देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजपने (BJP) यावेळी माघार का घेतली. हे सगळं कटकारस्थान भाजपकडून रचणं चालू असून दुसऱ्यांची घर फोडायला भाजपला आवडतं, त्यानंतर ते हसतात. परंतु, ज्या दिवशी भाजपचे घर फुटेल, त्या दिवशी त्यांना कळेल असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपच्या पापाचा घडा भरला असून जनता लवकरच हा पापाचा घडा फोडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे..

तसेच पुढे ते म्हणाले की, भाजपने अजून आपला उमेदवार (Candidate) जाहीर केलेला नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे लोक राहत नाहीत का? अनेक लोक फॉर्म भरतात, भाजपने एबी फॉर्म न देणे, उमेदवार जाहीर न करणे, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल पटोले यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com