सीएमसीएस महाविद्यालयाचे नीलिमा पवार यांच्या हस्ते नामकरण

सीएमसीएस महाविद्यालयाचे नीलिमा पवार यांच्या हस्ते नामकरण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक (Maratha Vidya Prasarak Samaj Nashik) संचलित सीएमसीएस महाविद्यालयाचे (CMCS College) अ‍ॅड. नामदेवराव ठाकरे कॉमर्स मँनेजमेंट अँड कॉम्पुटर सायन्स कॉलेज (Adv. Namdevrao Thakre College of Commerce Management and Computer Science) असे नामकरण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते आज झाले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (The president of the organization, Dr. Tushar Shewale) होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते (Speaker Manikrao Boraste), चिटणीस डॉ. सुनील ढिकले (Secretary Dr. Sunil Dhikale), संचालक उत्तमबाबा भालेराव (Director Uttam Baba Bhalerao), भाऊसाहेब खातळे, डॉ. विश्राम निकम,

डॉ. प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, नानासाहेब महाले, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, डॉ. प्रशांत पाटील, अ‍ॅड. पंडितराव पिंगळे, अ‍ॅड. दिनकरराव ठाकरे, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सयाजीराव गायकवाड, नगरसेविका स्वाती भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, सी. डी. शिंदे, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. अजित मोरे, डॉ. एस. जे. कोकाटे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य डॉ. आर. डी. पाटील उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी मविप्र (MVP) संस्था ही 1914 साली लोकसहभागातून सुरु झालेली असून सुरुवातीला मूठ-मूठ धान्य व पै-पै गोळा करून कर्मवीरांनी संस्थेचा पाया रचला. संस्थेच्या प्रथम वास्तू उदाजी वसतिगृहाचे अ‍ॅड. नामदेवराव ठाकरे (Adv. Namdevrao Thackeray) हे विद्यार्थी (students) होते तसेच शिक्षण (education) पूर्ण केल्यानंतर त्यांनी अ‍ॅड. मुरकुटे यांच्या निधनानंतर सेक्रेटरीपदाची जबाबदारी चोख पार पाडली. जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती (Zilha Parishad President and Speaker) असतांना अ‍ॅड. ठाकरे यांनी संस्थेला कायम मदत केली. त्यांचे नाव आज सीएमसीएस महाविद्यालयाला दिले जात असून त्याचा संस्थेला आनंद होत आहे.

सभापती माणिकराव बोरस्ते यांनी कर्मवीरांनंतर अ‍ॅड. नामदेवराव ठाकरे यांनी ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. अ‍ॅड. ठाकरे यांनी वकिली व्यवसायात नावलौकिक मिळवताना संस्थेला कायम मदत केली. संस्थेच्या इतिहासात नानांचे योगदान नक्कीच मोलाचे राहील, असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. तुषार शेवाळे यांनी अ‍ॅड. नामदेवराव ठाकरे यांच्या कार्याचा उचित गौरव म्हणून संस्थेने त्यांचे नाव देण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यांनी 14 वर्षे संस्थेसाठी भरीव योगदान दिले.

कर्मवीरांनी संस्थेचा पाया भक्कम केला. तसेच संस्थेच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सर्वांचे डॉ. शेवाळे यांनी आभार मानले. प्रास्ताविकात संचालक नानासाहेब महाले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. विभावरी पाटील व प्रा. शीतल कारे यांनी तर आभार चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मानले. यावेळी संजय होळकर, दादासाहेब कापडणीस, अ‍ॅड. राजेंद्र घुमरे, काजीसांगवी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com