नामकरण समितीने घेतली पालकमंत्र्यांची भेट

नामकरण समितीने घेतली पालकमंत्र्यांची भेट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ (ओझर) )नामकरण समितीच्या शिष्टमंडळाने नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली व ओझर विमानतळाला ( Ozar Airport ) कर्मवीर दादासाहेब गायकवाड ( Karmaveer Dadasaheb Gaikwad ) यांचे नाव देण्याची मागणी केली.

सन 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आग्रह करून हा विमान कारखाना नाशिकला ओझर येथे उभारण्यास मंजुरी मिळवली.या कारखान्याचाच एक भाग म्हणून ओझर विमानतळ सुरू करण्यात आले आहे.

या सर्व मूळ प्रक्रियेमध्ये दादासाहेब गायकवाड यांचा सहभाग असल्यामुळे व ते या भागाचे भूमिपुत्र असल्याने, त्याकाळात या संसदीय क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून(खासदार) काम केल्याने व सध्या या विमानतळाला कोणत्याही व्यक्तीचे नाव प्रस्तावित नसल्याने सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची नामकरणाची मागणी आहे असे निवेदन भुजबळ यांना देण्यात आले.

पालकमंत्री यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद देवून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे ओझर येथील विमानतळास नामकरण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे, बाळासाहेब शिंदे, विलास पवार, दि.ना. उघाडे, दिपचंद दोंदे, मदन शिंदे, आदेश पगारे, अनिल आठवले, कैलास पगारे, बाळासाहेब साळवे, दिलीप आहिरे, ओंकार देहाडे, प्रशांत कटारे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com