Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर

मृतांमध्ये धुळ्यातील भाजपच्या नगरसेवकाचा समावेश
Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील नाशिक-चांदवड महामार्गावर आज सोमवार (दि.१८) रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कार व कंटेनर (Car and Containers) यांच्यात भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली होती. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला होता. मात्र, अपघात झाल्यानंतर मृतांची नावे कळू शकलेली नव्हती. त्यानंतर आता मृतांची नावे समोर आली आहेत...

Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर
Nashik Accident News : कार-कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील (Dhule District) रहिवाशी आहेत. ते नाशिककडून धुळे (Nashik to Dhule) येथे चालले होते. त्यावेळी त्यांच्या कारचा चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रासमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाला होता. यावेळी अपघातात कारमधील कृष्णाकांत चिंधा माळी (रा. राम मंदिरजवळ, मु.पो. मोघन, ता.जि. धुळे) अनिल विष्णू पाटील, (रा.अवधान, धुळे) प्रवीण मधुकर पवार, (रा.अवधान, धुळे) यांच्यासह धुळ्यातील भाजपचे (BJP) नगरसेवक किरण हरीचंद्र अहिरराव यांचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर
Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट झाले मालामाल; दोन महिन्यात मिळाले 'इतक्या' कोटींचे उत्पन्न

दरम्यान, भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती निधनामुळे (Accidental Death) राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरक्षा चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वडनेर भैरव पोलीस (Vadnerbhairav ​​Police) व सोमा टोलवेज कंपनीच्या अपघातग्रस्त पथकाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. तसेच या अपघातामुळे काहीवेळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर
Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसणार, IMD कडून अलर्ट जारी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com