ओझर विमानतळाला त्र्यंबकेश्वराचे नाव द्या; साधू महंतांची मागणी

ओझर विमानतळाला त्र्यंबकेश्वराचे नाव द्या; साधू महंतांची मागणी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

ओझर विमानतळाला (Ozar Airport) त्र्यंबकेश्वर विमानतळ असे नाव द्यावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आखाडा परिषदेच्या प्रतिनिधींनी केली आहे. महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज (Mahamandaleshwar Someswarananda Saraswati) व निरंजनी आखाड्याचे ठाणापती धनंजय गिरी महाराज (Dhananjay Giri Maharaj) यांनी ही मागणी केली आहे.

आसाम सरकारने भीमाशंकर (Bhima Shankar) ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना साधू महंतांनी आसाम सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच राजकीय भाष्य टाळीत साधू म्हणाले की, महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे रेल्वे आणि बसने जोडली जावी. पाच ज्योतिर्लिंगांची सुरक्षितता व्हावी.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

ओझर विमानतळाला त्र्यंबकेश्वराचे नाव द्या; साधू महंतांची मागणी
जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

साधूंच्या महाशिवरात्र (Mahashivratri) पर्वस्नान यासाठी आयोजित बैठकीनंतर साधू प्रतिनिधी बोलत होते. यावेळी जुना आखाड्याचे विष्णूगिरी महाराज, आनंद आखाड्याचे गिरिजानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद महाराज, शिवानंद महाराज तसेच कार्यकर्ते शामराव गंगापुत्र, साधू महंत, आखाडा प्रमुख महंत उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com