
नासिक | Nashik
येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (Vasantrao Narayanarao Naik) शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय नासिक यांच्या वतीने आयोजित वसंत करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या (Yashwantrao Chavan Law College) पराग बदिरके ने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे रोख रू ७००१ चे बक्षीस, प्रमाणपत्र व वसंत करंडक पटकावला.
पारितोषिक वितरण (Distribution of Prizes) संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त दामोदरअण्णा मानकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त दिगंबर गिते उपस्थित होते. दुसऱ्या क्रमांकाचे रुपये ५००१ व प्रमाणपत्राचे बक्षीस गडहिंग्लज महाविद्यालयाच्या संकेत पाटील यांनी पटकावले, तिसऱ्या क्रमांकाचे रू. ३००१ रुपयाचे बक्षीस पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुग्धा थोरात यांनी मिळवले तर रू. १००१ चे उत्तेजनार्थ बक्षीस नाहटा महाविद्यालय भुसावळ येथील सायली महाजन हिला मिळाले.
पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय सानप, उपप्राचार्य पौर्णिमा बोडके,स्पर्धेच्या संयोजिका प्रा.डॉ.नंदादेवी बोरसे,स्पर्धेचे परीक्षक डॉ. मनीषा डोंगरे,डॉ. शोभा डहाळे यांच्यासह मान्यवर उस्थितीत होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दामोदर मानकर म्हणाले की चांगली संभाषण व चांगले वक्तृत्व (Oratory) असणाऱ्या व्यक्तीला अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी मागणी असते, वकृत्व कलेच्या माध्यमातून एक चांगला रोजगार मिळू शकतो, बोलताना वेळेचे नियोजन महत्त्वाचे असते.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना दिगंबर गिते यांनी सांगितले की नेतृत्व कर्तृत्व, वक्तृत्व (Oratory) चांगले असणारी व्यक्ती यशस्वी होत असते,अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपली कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. क्रांतिवीर (Revolutionary) वसंतराव नाईक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे.
सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहचिटणीस ऍड. तानाजी जायभावे होते. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त भास्करराव सोनवणे सुभाष कराड, दामोधर मानकर, प्राचार्य डॉ. संजय सानप, प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉ. पोर्णिमा बोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सतरा वर्ष अविरत सुरु असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून ५९ महाविद्यालयाच्या (colleges) संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. संजय सानप, उपप्राचार्य डॉ.पौर्णिमा बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या संयोजिका तथा वाङमय मंडळाच्या प्रमुख प्रा. डॉ. नंदादेवी बोरसे, प्रा. सुरेखा नागरे, प्रा. संदीप पगारे, प्रा. सुनीता बेडसे, प्रा. सीमा केदार, प्रा. सुनील गायकवाड, प्रा.डॉ.भास्कर आव्हाड यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी वर्गाने परीश्रम घेतले.