‘नामको’चा 150 केव्ही सौरऊर्जा प्रकल्प

‘नामको’चा 150 केव्ही सौरऊर्जा प्रकल्प

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

महाराष्ट्रात (Maharashtra) आपला वेगळा लौकिक ठेवून असलेल्या नाशिक मर्चंटस् को-ऑप. बँकेने (Namco Bank) सातपूर औद्योगिक वसाहतीतील (Satpur MIDC) आपल्या मुख्यालयाच्या इमारतीत 150 किलोवॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प (Energy project) उभारला आहे...

या प्रकल्पाचे उद्घाटन चेअरमन हसत धात्रक यांच्या हस्ते नुकतेच झाले. बँकेतील विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली ग्रीन बँक (इकोफ्रेन्डली) म्हणून ओळखली जात आहे. या सौर प्रकल्पामुळे वीजबिलाच्या रकमेच्या बचतीसोबतच ही प्रणाली 2.10 टन कार्बन उत्सर्जन कमी करेल.

यामुळे प्रदूषण कमी होईल, विजेची मोठी बचत होईल. पावणेदोन लाखांच्या आसपास सभासद असलेल्या नामकोचा कारभार मुख्य काम ठेवी स्वीकारणे, कर्ज वितरण हे असते. मात्र तेथेही या बँकेने आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे.

प्रशासकीय कार्यालयाचे नुकतेच झालेले नूतनीकरण सुखावत असतानाच आता थेट रूफटॉप सोलर प्रकल्प (Rooftop Solar Project) उभारून बँकेच्या कारभार्‍यांनी दीर्घकाळ बँकेचा फायदाच केला आहे. प्रशासकीय कार्यालयाचे मासिक वीजबिल साडेचार लाखांच्या आसपास येत असते. मात्र हा प्रकल्प उभारल्यानंतर पहिलेच वीजबिल (Electricity bill) तीन लाखाने घटले आहे.

62 लाखांच्या आसपास खर्च झाला असला तरी पहिल्या महिन्याची बचत पाहता 24 महिन्यांत प्रकल्पाचा खर्च व्याजासह वसूल होऊ शकेल. 50 किलोवॅटचा हा प्रकल्प 45 दिवसांत उभारला गेला असून इतर बँकांसाठी हा उपक्रम निश्चितच आदर्शवत म्हणावा लागेल. प्रकल्पाचा शुभारंभ बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com