नमामि गोदा प्रकल्प कुंभमेळ्यापर्यंत शक्य

मनपाची सल्लागार नेमणुकीसाठी अंतिम वाटाघाटी सुरू
गोदाघाट
गोदाघाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दर बारा वर्षांनी नाशिक (nashik) मध्ये भरणारा कुंभमेळा (Kumbh Mela) आता 2027 मध्ये भरणार आहे. त्याचे शासनासह स्थानिक प्रशासन पातळीवर नियोजनाची तयारी सुरू झाली आहे.

महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) याबाबत एक समितीची स्थापना केली असून प्रधान्यक्रमाने करण्यात येणाऱ्या कामांचा अहवाल ही समिती लवकरच महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या (central government) 1823 कोटी रुपये निधीच्या (fund) आधारे नमामि गोदा प्रकल्प (Namami Goda Project) साकारण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू केले असून आगामी कुंभमेळा (Kumbh Mela) पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या (central government) नमामि गंगेच्या धरतीवर दक्षिणेतील गंगा असणाऱ्या गोदावरी नदी (godavari river) किनारी नमामि गोदा प्रकल्प (Namami Goda Project) उभारावा अशी मागणी तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी केंद्र सरकारकडे केली होती. याबाबत त्यांनी पाठपुरावा करून सुमारे 1823 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

नमामि गोदा प्रकल्प (Namami Goda Project) प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून सात पैकी दोन सल्लागार अपात्र ठरविण्यात आले होते, पात्र ठरलेल्या पाच आवेदनांचा अभ्यास करून त्यातील सर्वात कमी बोली लावणाऱ्या एका कंपनीशी महापालिकेची आर्थिक वाटाघाटी सुरू आहे. ती पुर्ण झाल्यावर सल्लागाराच्या माध्यमातून नमामि गोदा प्रकल्पाचा डीपीआर (DPR) तयार होणार आहे. तसेच केंद्र, राज्य शासनाची पत्रव्यवहार करून कामाला गती मिळणार आहे.

2027 मध्ये नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे (Simhastha Kumbh Mela) आयोजन होणार आहे. त्यापूर्वी नमामि गोदा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असल्यामुळे नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner and Administrator of Nashik Municipal Corporation Dr. Chandrakant Pulkundwar) प्रयत्नशील आहेत. त्यांनी गुजरात (gujrat) मधील साबरमती रिव्हर फ्रंटचा (Sabarmati River Front) डीपीआर मागवला आहे.

अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर 'नमामी गोदा' प्रकल्पाअंतर्गत गोदाकाठाचा विकास व सुशोभिकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने 'नमामी गोदा' प्रकल्पाअंतर्गत गोदेची स्वच्छता व सुशोभिकरणासाठी महापालिकेला 1823 कोटी रुपये निधी देणार आहे. त्या अंतर्गत विविध कामे हाती घेतली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com