'नमामी गोदा' प्रकल्पाचा आराखडा तयार

'नमामी गोदा' प्रकल्पाचा आराखडा तयार
गोदाघाट

नाशिक | Nashik

'नमामी गंगे'च्या (Namami Gange) धर्तीवर दक्षिणेची गंगा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोदावरी नदीच्या(Godawari to River) स्वच्छतेसाठी १८२३ कोटींच्या 'नमामी गोदे' प्रकल्पाच्या (Namami Goda Project) मंजुरीसाठी केंद्रीय जलमंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची मागणी महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी सोमवारी(दि.९) केद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केली....

नाशिकच्या (Nashik) या प्रकल्पासाठी जलमंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी गडकरींनी दिल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.

गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी (Godawari River Pollution) नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा ही महत्वाकांक्षी योजना हाती घेण्याचा संकल्प महापालिकेतील सत्तारूढ भाजपने केला आहे.

महापौरपदी विराजमान झाल्यानंतर कुलकर्णी यांनी पहिलीच योजना नमामी गोदेच्या रुपाने जाहीर केली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापौर कुलकर्णी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करीत आहेत.

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातही (NMC Budget) या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी १८२३ कोटी रुपयांचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com