नायगावला पाच दिवस बंद

नायगावला पाच दिवस बंद

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यात नायगावला करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारपासून दि. ४ पासून मंगळवार (दि. ८) पर्यंत गाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय नायगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

या पाच दिवसांच्या काळात दवाखाने व मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. दूध डेअरी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ पर्यंत सुरू राहतील.

या आदेशाचे पालन न करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न वापरता फिरणार्‍यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात येईल, असेही प्रशासनाने प्रसिद्धपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

ग्रामपंचायतीच्या प्रशासकांसह ग्रामविकास अधिकारी, पोलीसपाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com