एकाच दिवशी नाशकात चार घरफोड्या; नागरिक दहशतीखाली

एकाच दिवशी नाशकात चार घरफोड्या; नागरिक दहशतीखाली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात विविध चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये एकूण ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याची माहिती समोर आली आहे. सातपूर (Satpur), नाशिकरोड (Nashikroad), इंदिरानगर (Indiranagar) आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police station) हद्दीत या घटना घडल्या आहेत...

पहिल्या घटनेत, नांदूर गाव (Nandurgaon) येथील मधुगिरी कॉलनी (Madhugiri colony) येथे राहणारे मिलिंद हिरगुडे (Milind Hirgude) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम लांबविली आहे. अधिक तपास आडगाव पोलीस (Adgaon Police) करत करत आहे.

दुसऱ्या घटनेत, पळसे येथील साई विश्व अपार्टमेंट (Sai Vishwa Apartment) येथे राहणारे भास्कर कातकाडे (Bhaskar Katkade) यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी ६१ ग्राम सोने आणि २५ हजारांची रोख रक्कम लंपास केली असल्याची घटना घडली आहे. अधिक तपास नाशिकरोड पोलीस करत आहे.

तिसऱ्या घटनेत, अशोकनगर (Ashoknagar) येथे राहणारे किरण साळवे (kiran salave) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत ६० हजार रकमेचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत. चौथ्या घटनेत पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील आयकर कॉलनी (aykar colony) येथे गणराज रो हाउसमध्ये राहणारे किरण पुरकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडत प्रवेश करत १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास इंदिरानगर पोलीस (Indirangar Police) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com