दिंडोरी नगरपंचायत
दिंडोरी नगरपंचायत
नाशिक

दिंडोरीच्या मुख्याधिकारीपदी नागेश येवले यांची नियुक्ती

डॉ.मयूर पाटील यांची बदली

Nitin Gangurde

दिंडोरी । Dindori

दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांची नाशिक महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी सुरगाणा नगरपंचायतीचे परिविक्षाधिन मुख्याधिकारी नागेश येवले यांची निवड करण्यात आली आहे.

प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांची बदली झाली असून नागेश येवले यांना दि.12 रोजीपासून दिंडोरी नगरपंचायतीचा कार्यभार घेण्यास नगरविकास विभागाने आदेश दिले आहे.

प्रशासकीय बदलीनंतर दिंडोरी शहरात येवले यांनी पदभार स्विकारण्याचे कांमकाज सुरु झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com