नगरपंचायत निवडणूक : आरक्षण बदलाने इच्छुकांची धावपळ

नगरपंचायत निवडणूक : आरक्षण बदलाने इच्छुकांची धावपळ

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी नगरपंचायत निवडणूक Nagar Panchayat Election आरक्षण Reservation सोडतीत अखेरीस अनेक प्रभागांचे आरक्षण बदलल्याने इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिंडोरी नगरपंचायतीची आरक्षण सोडत आदिवासी सांस्कृतिक भवन येथे पार पडली. प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर, मुख्याधिकारी नागेश येवले यांनी आरक्षण प्रक्रियेची माहिती दिली. सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम करण्यात आले. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत झाली.

पूर्वीच्या आरक्षणाप्रमाणे प्रभाग क्र.2, 8, 13, 14 हे सन 2015 ला इतर मागासवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले. ते सर्वसाधारण राखीव झाले. इतर उरलेल्या जागांमध्ये चिठ्ठी काढण्यात आली. प्रभाग क्र. 11 हा इतर मागासवर्गासाठी राखीव झाला. प्रभाग क्र. 16 इतर मागासवर्ग स्त्रीसाठी राखीव झाला. प्रभाग क्र.2, 5, 6, 14, 17 पैकी एक जागा महिला राखीव महिलांसाठी काढण्यात येणार होती. ती चिठ्ठी प्रभाग क्र. 6 ची निघाली.

त्यामुळे प्रभाग क्र. 1, 6, 7, 8, 13 हे सर्वसाधारण महिला राखीव झाले. 2, 5, 14, 17 हे प्रभाग सर्वसाधारण झाले. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक प्रभागांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदा अनेक प्रभागांत नवोदितांना संधी आहे. चारित्र्यसंपन्न, कार्यक्षम आणि उमद्या उमेदवारांना यंदा जनता पसंती देताना दिसत आहेे.

पॅनल बनवताना आता तयारी सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार दुसर्‍या प्रभागात लक्ष देत आहेत त्यांना त्यांच्या प्रभागात रोखण्यांसाठी आतापासून तयारी सुरू झालेली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या भूमिका गुलदस्त्यात आहेत. युती, आघाडी यांच्यात अनेक ठिकाणी बिनसलेले आहे. त्यामुळे ते घाव अजूनही प्रमुख नेत्यांच्या मनातून जात नाहीत. त्यामुळे अर्थपूर्ण वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. परंतु सामान्य जनता यंदाच्या निवडणुकीत डोळ्यात तेल घालून काय घडत आहे हे पाहत आहे. यंदाची निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे.

कळवणला 17 प्रभागांत आरक्षण निश्चित

कळवण नगरपंचायत Kalwan Nagarpanchayat नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता कळवण नगरपंचायत कार्यालयात उपविभागीय अधिकारी मालेगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शहरातील नगरपंचायतीचे एकूण 17 प्रभागांमधील आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली.

त्यानुसार कळवण नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 करता एकूण 17 प्रभागांसाठी पुढीलप्रमाणे आरक्षण राहणार असे जाहीर करण्यात आले. प्रभाग क्र. 1 : सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 : अनुसूचित जमाती स्री, प्रभाग क्र. 3 : अनुसूचित जमाती, प्रभाग क्र. 4 : सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5 : सर्वसाधारण, प्रभाग क्र. 6 : अनुसूचित जमाती स्री, प्रभाग क्र. 7 : सर्वसाधारण स्री, प्रभाग क्र. 8 : सर्वसाधारण, प्रभाग क्र. 9 : सर्वसाधारण स्री, प्रभाग क्र. 10 : अनुसूचित जाती स्री, प्रभाग क्र. 11 : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्री, प्रभाग क्र. 12 : नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, प्रभाग क्र. 13 : सर्वसाधारण स्री, प्रभाग क्र. 14 : अनुसूचित जाती, प्रभाग क्र. 15 : सर्वसाधारण स्री, प्रभाग क्र. 16 : अनुसूचित जमाती, प्रभाग क्र. 17 : सर्वसाधारण स्री. आरक्षण सोडतीस कळवण नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सुरगाण्यात ओबीसी आरक्षणऐवजी सर्वसाधारण गट

पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा नगरपंचायतमधील Surgana Nagar panchayat 17 प्रभागांतील सदस्यांसाठी आरक्षण सोडत बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततेत पार पडली.

काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार ओबीसीची जागा आता राहणार नसून ही जागा सर्वसाधारण करण्यात आली आहे. उर्वरित जागा मात्र आहे तशीच असणार आहे. केवळ ओबीसी जागा ओपन करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतसंदर्भात काही हरकत किंवा सूचना असल्यास त्यासाठी दि. 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत करता येईल. यादरम्यान हरकत किंवा सूचना आल्यास त्यावर 17 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाईल. यावेळी नायब तहसीलदार मोरे, रमेश थोरात, भरत वाघमारे, सचिन महाले, अकिल पठाण, अब्बास शेख, प्रकाश वळवी, दिनकर पिंगळे, कैलास सूर्यवंशी, अर्जुन शिंदे, सोमनाथ पवार आदींसह नगरपंचात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या आरक्षण सोडतीनुसार उमेदवार उभे करावे लागणार.

वॉर्ड क्र. 1. अनुसूचित जमाती - महिला किंवा पुरुष, 2. जनरल - खुला, 3. अनुसूचित जमाती - महिला, 4. अनुसूचित जमाती - महिला 5. सर्वसाधारण - महिला, 6. अनुसूचित जाती - खुला 7. अनुसूचित जमाती - महिला 8. जनरल - महिला किंवा पुरुष 9. सर्वसाधारण - खुला 10. अनुसूचित जमाती - महिला 11. अनुसूचित जमाती - महिला 12. अनुसूचित जमाती - खुला 13. सर्वसाधारण - महिला 14. अनुसूचित जमाती - खुला 15. अनुसूचित जमाती - खुला 16. सर्वसाधारण - महिला 17. सर्वसाधारण - महिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com