नगरपंचायत निवडणूक : ११ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान

नगरपंचायत निवडणूक : ११ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान

नाशिक | प्रतिनिधी Nashik

न्यायालयाने ओबीसी आरक्षण (OBC Reservation) नाकारल्याने नगरपंचायत निवडणूकीत ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात केल्यानंतर या जागांवर सर्वसाधारण उमेदवार उभे करून यासाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे....

गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये मतदान झाले. मात्र ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे त्यापैकी चार नगरपालिकांमधील ११ जागांवर निवडणूक झाली नव्हती. आता या जागांवर खुल्या गटातून उमेदवार निवडणूक लढू शकणार आहेत. आता या ११ जागांसाठीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. (nagarpanchayat voting for 11 seats on 18th of January 2022)

जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या ६ नगरपंचायतींसाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणे प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित ११ जागांबाबत कुठला निर्णय घ्यावयाचा म्हणून निवडणूक आयोगाने या जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवली होती. त्यानंतर न्यायालयाने आरक्षण रद्द केले. परिणामी या जागांची नव्याने निवडणूक घेण्यासाठी आयोगाने कार्यक्रम जाहीर केला.

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निफाड, देवळा, दिंडोरी आणि कळवण या चार नगरपंचायतीतील ओबीसींच्या ११ जागांची सर्वसाधारण गटातून अर्थात आरक्षण रहित निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन उमेदवारांना अर्ज सादर करणे,छाननी, अर्ज माघारी,निवडणूक चिन्ह वाटपासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून १८ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com