नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जाहीर; दिंडोरीला वगळले

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जाहीर; दिंडोरीला वगळले
USER

दिंडोरी । प्रतिनिधी Didori

विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी Nagarpanchayat Elections 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी vote Counting होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. त्याचबरोबर दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक ही अद्याप घोषित केली नसून उच्च न्यायालयात याचिका असल्याने निवडणूक लांबल्याचे समजते.

राज्यातील 105 नगरपंचायतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला. त्यात दिंडोरी नगरपंचायत वगळण्यात आली आहे. सध्या न्यायालयात दिंडोरी शहराच्या प्रभाग क्र. 5 मधील प्रभाग रचनेवरुन हरकत असल्याने दिंडोरी नगरपंचायत निवडणूक घोषित केली नसल्याचे समजते. तथापि याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण पाठवण्यात आले नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त मदान यांनी कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणार्‍या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल.

त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल.

22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. राखीव जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com