नागली, वरई दुर्मिळ; 'या' कारणामुळे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

नागली, वरई दुर्मिळ; 'या' कारणामुळे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

ओझे । विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्याचा (dindori taluka) पश्चिम भाग एके काळी नागली (Nagli) व वरईचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये या परिसरामध्ये शासनाच्या योजना पोहचल्यांमुळे

पावसाळी हंगामात (Monsoon) पाण्याची साठवणुक करण्यासाठी छोट मोठ्या पाझार तलावाची निमिर्ती झाल्यांमुळे येथील शेतकर्‍यांनी (farmers) आपल्या पारपांरिक पिकामध्ये बदल करुन जास्त उत्पादन देणार्‍या पिकांकडे वळल्यांमुळे नागली (Nagli) व वरई (varai) पिक या भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे नागली व वरई पिक चार महिन्याचे असते त्यांत या पिकांचे रोपे तयार करावे लागतात.

मे महिन्यातच या रोपासाठी काडी कचरा गोळा करून रोपाची जागा भाजून घेतात. व जून महिन्यात पहिला पाऊस पडल्या नंतर रोपे टाकली जातता साधारण 22 ते 23 दिवसांमध्ये हे रोपे तयार होतात मग जमिनीची मशागत करून व पावसाचा अदांज पाहून नागली , वरई पिकाची लावणी केली जाते हे पिक जास्ती जास्त डोंगरउतारावर घेतले जाते या पिकाला भरपूर पाऊस लागतो.

मेहनतीच्या तुलनेत नागली व वरईचे एकरी उत्पादन तीन ते चार क्विंटल एवढेच असते. नागली व वरई हे पिक (crop) पूर्णपणे वरच्या पावसावर तयार अवलंबून असून संपूर्णपणे सेंद्रिय पिक (organic crop) मानले जाते, यासाठी कुठलीही रासायनिक फवारणी किंवा रासायनिक खताचा (Chemical fertilizers) वापर केला जात नाही. सध्या नागली व वरईला ग्रामीन भागासह शहरी भागात जास्त मागणी आहे.

नागलीचा उपयोग भाकरी तसेच पापड बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच सध्यात मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये नागली पापड, बिस्कीटला जास्त मागणी आहे. वरईचा वापर ग्रामीण व शहरी भागामध्ये उपवासासाठी केला जातो. असे असले तरी मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी होत असल्यामुळे व नागली वरई पिकाचे एकरी उत्पादन खूपच कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाने

या पिकांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्यामुळे नागली व वरई हे पिक तालुक्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परवडत नसलेली शेती म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परिणामी या परिसरातील शेतकर्‍यांनी या पांरपारिक शेतीकडे पाठ फिरवून इतर भाजीपाला पिकाना पंसती दिली आहे.नागली व वरई पिकापासून एकरी उत्पादन खूप कमी मिळत असल्यांमुळे उत्पन्नात घट येते त्यांमुळे आम्ही हे पिक फक्त कुटूंबासाठी लागेल एवढेच घेतो. नागली, वरई जागी आम्ही इतर पिकानां पंसती दिली आहे.

- रमाकांत शार्दुल, शेतकरी ननाशी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com