नाफेडने तीन हजार प्रति क्विंटलने कांदा खरेदी करावी

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी
नाफेडने तीन हजार प्रति क्विंटलने कांदा खरेदी करावी
कांदा उत्पादक

नाशिक । प्रतिनिधी

नाफेडने जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांदा खरेदी सुरू केली आहे.मात्र,नाफेडकडून सध्या पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलनेच खरेदी सुरू आहे. त्यामुळे नाफेडने तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने नाफेडकडे शेतकर्‍यांसाठी केली आहे.

महाराष्ट्रात नाफेडमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना शेतकर्‍यांचा कांदा खरेदीचे अधिकार दिलेले आहेत. त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून थेट कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून आजचा कांदा खरेदी केला जात आहे.

मात्र,या कंपन्या पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव देत आहेत.तो त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी नाफेडला तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा द्यायचा किंवा नाही द्यायचा हा अधिकार फक्त स्वतः कांदा उत्पादक बांधवांनाच आहे.त्यामुळे नाफेडने तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नसून कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी नाफेडला कांदा विक्री करतांना कोणालाही कमिशन देऊ नये,असे आवाहनही दिघोळे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com