नाफेडने कांदा खरेदी करावा - व्यापारी संघटनेची मागणी

नाफेडने कांदा खरेदी करावा - व्यापारी संघटनेची मागणी

ओझे l वार्ताहर OZE

नाफेडने लवकरात लवकर कांदा खरेदी प्रक्रीया चालु करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी दिंडोरी कृषी उपन्न बाजार समिती उप आवार वणी येथे व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष मानिष बोरा व व्यापारी यांनी शेतकरी यांच्यासह एकमताने सरकारकडे मागणी करण्यात आली.

रब्बीच्या हंगामापासुन तर खरीप हंगामापर्यंत निसर्गाचा सततचा लहरीपणा यामुळे नगदी पिक म्हणुन ओळखले जाणारे टोमॅटो द्राक्ष आणि कांदा याकडे शेतकरी प्रकर्षाने लक्ष देत असतो परंतु चालु वर्ष हे शेतकऱ्यांसाठी काळाचे असल्याचे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.टोमॅटो आणि द्राक्ष पिकात विस ते पंचविस टक्के शेतकऱ्यांना जेमतेम पैसे झाले मात्र इतर शेतकऱ्यांना भांडवल निघणे सुद्धा मुश्किल झाले होते.आणि पिकात काही बदल करावा म्हणुन चालु वर्षी शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात कांदा पिकाकडे झुकल्याचे चित्र दिसुन येत होते.कारण त्यातुन तरी थोडाफार आर्थिक हातभार मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी करीत होते.

मात्र निसर्गाचा कोप हा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मुळावरच उठल्याचे आता स्पष्ट झाले आहे.कारण उन्हाळ कांदा बाजारात दाखल होवुन जवळपास दिड दोन महिने उलटले मात्र अद्यापही बाजार भावात झळाळी आली नाही.त्यातच निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला माल खरेदी करुन परराज्यात पाठविण्यास व्यापारी धजावत नाही.त्यामुळे कांदा उत्पादक हा निराश झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यात शासनाने ठराविक कालावधीचा निकष लावून अनुदान जाहीर केले.परंतु त्याच्या पुढील काळात सुद्धा कांद्याच्या भावात घसरण हि कायमच राहुन सध्यास्थितीत उत्पादन खर्च तर दुरच परंतु मार्केटला ने आण करण्याचा खर्च सुध्दा महाग पडल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

विशेष म्हणजे नैराश्यपोटी शेतकऱ्यानी जिवनात टोकाचे पाऊल उचलु नये. याकरीता प्रामुख्याने कांदा अनुदानाच्या मुदतीचा काळही वाढवुन द्यावा अशीही मागणी सुध्दा  आता जोर धरू लागली आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्या व हतबलता लक्षात घेवुन वणी व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष मनिष बोरा,समवेत नंदलाल चोपडा,अमित चोरडीया,अतुल पाटील, गितेश बोरा,प्रकाश बोरा,शितलदास, शरद ससाणे,संदिप कर्पे, अशोक बोरा,एस के राठोड,सुरेश देशमुख,भुषण मुळाणे,दत्तु सोनवणे,क्रिष्णा गायकवाड,सागर बोरा, शुभम बोरा, अरविंद खिसोदिया, सचिन गायधणी, व्ही टी सी ,अझर, फरीद संजय उंबरे व मोठया संखेने कांदा उत्पादक शेतकरी यांनी नाफेडची खरेदी लवकरात लवकर चालु करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी एकमुखाने सरकारकडे मागणी करण्यात आली.व सन २०२३ हे वर्ष सेव्ह द फार्मर अशी टॅग लाईन वापरून हे वर्ष शेतकऱ्यांच्या सोबत राहने गरजेचे आहे असे सांगुन एक प्रकारे संपुर्ण देशाला आव्हानच केल्याचे मनिष बोरा यावेळी बोलत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com