विकलांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचे नॅबचे काम जिकरीचे: गुंडे

विकलांगांना मुख्य प्रवाहात आणण्याचे नॅबचे काम जिकरीचे: गुंडे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कर्णबधीर अंधत्व (Deaf blindness) व बहुविकलांग (Multiple disabilities) विद्यार्थ्यांचे शिक्षण (Student Education) व पुनर्वसन आंनी प्राथमिक लक्षणे व त्यावरील उपचार ओळखून त्यांना सामान्य मुलांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणणे हे जिकरीचे काम नॅब (NAB) सारखी संस्था करीत आहे.

हि स्पृहणीय बाब आहे. त्यांनी कर्णबधीर व्यक्ती (Deaf person) राष्ट्रीय स्तरावर बडमिंटन (Badminton) खेळणार्‍या व्यक्तीचे चित्रण समोर ठेऊन दिव्यांग उंच भरारी घेऊ शकतात त्यांना संधी व उचित मार्गदर्शन देण्याची गरज आहे ती पूर्तता नॅब संस्था (NAB Institute) करीत आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे (Zilha Parishad Additional Chief Executive Officer Arjun Gunde) यांनी काढले.

कर्णबधीरअंधत्व व बहुविकलांगता दिव्यांगाचा समावेश 2016 च्या दिव्यांग कायद्यान्वये नव्याने समाविष्ठ झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व विशेष शाळा (school), समग्र शिक्षण, अनुदानित व विनानुदानित शाळेतील विशेष शिक्षकांचे एक दिवसीय कार्यशाळा नॅब संकुलात नॅब महाराष्ट्र, सेन्स इंडिया (Sense India) व बजाज आलायंस यांच्या सहकार्याने आयोजित केला होता.

त्या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनिता धनगर, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील ,नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री,मानद महासचिव गोपी मयूर तसेच मुक्तेश्वर मुशेटटीवार, सिंधू काकडे, सूर्यभान साळुंखे, पूजा भालेराव यांच्या हस्ते दिप्रज्वलन व हेलन केलर व लुई ब्रेल यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रामेश्वर कलंत्री होते. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देवून भविष्यकालीन योजनेचा उल्लेख केला तर गोपी मयूर यांनी कार्यशाळेचा उद्देश व त्यांचे महत्व ह्या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रारंभी सर्व पाहुण्यांचे भावना चांडक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने ते शाल व गुच्छ देवून पाहुण्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

योगेश पाटील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सौ सुनिता धनगर प्रशासन अधिकारी मनपा यांनी समयोचित मार्गदर्शन करून दिव्यांगाना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत विशेष शिक्षकांना प्रात्यक्षिकसह विविध विषयांवर मार्गदर्शन करून दिव्यांगत्वाबद्दल जागुर्कता कशी व्हावी असे पाठ विशेष तज्ञ पूजा भालेराव यांनी दिले.

समारोप संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सूर्यभान साळुंखे व डॉ. मुक्तेश्वर मूनशेटटीवार यांच्या उपस्थित संपन्न झाला व त्यांनी दिव्यांग क्षेत्रातील नवी साधने व नवी दिशा शैक्षणिक डिजिटल पद्धतीने देण्याबाबत भाष्य करून विशेष शिक्षकांना स्वतःचे ज्ञान अद्यावत करावे अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्ह्यातील सहभागी विशेष शिक्षकांनी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सुत्रसंचलन वर्षा जाधव तर आभार प्रदर्शन डॉ. मुक्तेश्वर मुन्शेटटीवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com