'मविप्र'ची ऑनलाईन सभा आरोप प्रत्यारोपांंनी गाजली

'मविप्र'ची ऑनलाईन सभा आरोप प्रत्यारोपांंनी गाजली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (Nashik District Maratha Vidya Prasarak Samaj) (MVP) संस्थेची 107 वी वार्षीक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) आज ऑनलाईनच (Online) आरोप प्रत्यारोपांंनी गाजली. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नला संचालक मंडळाने चोख प्रत्युत्तर देऊन त्यांना शांत केले. साठ केंद्रांंवर त्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत केले. श्रीराम शेटे यांनी कोरोना (Corona) काळाताही संस्थेने केलेल्या भरघोेस प्रगतीचे जाहीर कौतुक केले. उपसभापती राघोनाना अहीरे, चिटणीस डॉ.सुनील ढिकले, नानासाहेब महाले, माणिकराव बोरस्ते, नानसाहेब दाते, नंदा सोनवणे, प्रल्हाद गडाख, विश्राम निकम,दत्तात्रय पाटील, सचीन पिंगळे, राजेंद्र पवार, अशोक पवार, जयंत पवार, भाऊसाहेब खताळे, उत्तमबाबा भालेराव, जयवंत पवार, हेमंत वाजे, अशोक पवार, डॉ प्रशांंत देवरे, रायभान काळे,आदींंसह अनेक संंचालक, सभासद यात सहभागी झाले होते.

अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती करुन सरचीटणीस निलीमा पवार (Nilima Pawar) यांंना धारेवर धरण्याचा प्रय्तन केला. मात्र त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला पवार यांंनी चौख उत्तर दिले. निलीमा पवार म्हणाल्या की, संस्थेच्या शाखा 487 आहे. 2 लाख़ 11 हाजर विद्यार्थी आहते. 2 हजार विद्यार्थी यंदा कमी झाले. 9641 सेवक आहेत.

173 शाखाा कार्यरत आहेत. ग्रामीण र्भागात दर्‍या खोर्र्‍यीच इटरनेट (Nternet) नाही मोबाईल नाही. अशी परीस्थीती असतांना ज्ञानगंगा पोचवण्याचे आव्हाण होते. ते पेलण्याचा प्रयत्न संस्थेने केले. कोरोनामुळे 33 वास्तु सध्या उघटानांच्या प्रतीक्षेत आहे. त्यांचे उद्घाटन लवकरच केले जाणार आहे. यावेळी त्यांनी सव्वा सातशे कोटीचे अंदांज पत्रक सादर केले. त्यास सभासदांनी मान्यता दिली.

दुखवट्याचे ठराव चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी मांडले दिवंगतांना आदारांंजली वाहन्यात आली. दिवंगत मंत्री डॉ दौलतराव आहेर यांचे नाव एखाद्या महाविद्यालयास देण्याचा ठराव यावेळी मंजुर करण्यात आला. दिलीप पाटील, शरद कोशीरेे,एस.टी शिंदे, लेखापाल राजाराम बस्ते, कोकाटे, मोरे आदींसह सभासद उपस्थीत होते.

सेवकाला राजकीय पक्षाचा सभासद पदाधिकारी राहता येणार नाही संस्थेतील शिक्षक (Teacher), विद्यार्थी (Students) यांच्यासाठी विमा योजना (Insurance plan) , वेतनवाढ, शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, भारतीय शैक्षणिक वारसा संग्रहालय, सभासद, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, सौरउर्जा प्रकल्प (Solar energy project),

मध्यवर्ती प्रशिक्षण व रोजगार केंद्र, वृक्षारोपण, जलसंधारण, संस्थेमध्ये झालेला नवीन शाखांचा समावेश, आर्थिक शिस्त, मध्यवर्ती संगणक कक्ष, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Dr. Vasantrao Pawar Medical College) माध्यमातून पुरविल्या जाणार्‍या अद्ययावत सुविधा त्याचप्रमाणे कोव्हीड (Covid-19) काळातील सेवाकार्य तसेच संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

संस्थेच्या घटनादुरुस्तीत कार्यकारी मंडळात दोन महिलांना प्रतिनिधित्व, तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र जिल्ह्याबाहेर वाढविण्यास परवानगी, आजीव सभासद व सेवक सभासद फी रु.200 वरून रु.5000 करण्यात आली. संस्थेच्या सेवेत असणार्‍या सेवकाला कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद अथवा पदाधिकारी राहता येणार नाही .

तसेच सेवकाला शिक्षक पतपेढी, लोकसभा,राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस उभे राहता येणार नाही. दुसर्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारी मंडळावर पदाधिकारी किंवा सदस्य असल्यास त्यास समाजाच्या अध्यक्ष अगर पदाधिकारी अगर कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून निवडणूक लढवता येणार नाही.

या नियमाचा भंग करून निवडून आल्यास त्याची निवडणूक अवैध समजली जाईल त्यास संस्थेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही व त्याचे सभासदत्व रद्द होण्यास प्राप्त राहील व त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढील वाटचालीत डिजीटल एमव्हीपी (Digital MVP), सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल (Superspeciality Hospital),

हॉर्टीकल्चर महाविद्यालय,आयुर्वेद महाविद्यालय (College of Ayurveda) ,पशुवैद्यकीय महाविद्यालय (Veterinary College), मूकबधिरांसाठी महाविद्यालय, महीला महाविद्यालय (Women's College) तसेच नवीन इमारतींची उद्घाटने इ.बाबत प्रेझेंटेशन द्वारे माहिती दिली. सुत्रसंचलन शिक्षणाधिकारी सी डी शिंदे यांनी,विषय वाचन डॉ डी. डी. काजळे यांनी, मागील सभेचे इतिवृत्त वाचन डॉ. एस. के. शिंदे यांनी, तर आभार संचालक डॉ प्रशांत देवरे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com