मविप्र विद्यार्थीभिमुख संस्था: नीलिमा पवार

मविप्र विद्यार्थीभिमुख संस्था: नीलिमा पवार

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

विद्यार्थी (students) हा केंद्रबिंदू ठरवून व द्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता (Educational quality of students) वाढवणारी मविप्र संस्था (MVP Institute) आहे. विद्यार्थ्याचे योग्य जीवन घडविण्यासाठी शिक्षक (teachers) काम करतात.

होरायझनमधील शिक्षकांनी तर शिस्तीचे व श्रमाचे धडे विद्यार्थ्यांमध्ये गिरवले. हेच या संस्थेचे मोठेपण आहे. गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीवर काम करणारी ही संस्था असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार (MVP general secretary Nilima Pawar) यांनी केले.

सिन्नर शहरातील (sinnar city) होरायझन अकॅडमीच्या (Horizon Academy) विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या डॉ. तुषार शेवाळे (Dr Tushar Shewale) अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे, माणिकराव बोरस्ते, माजी आमदार राजाभाऊ वाजे, सुनील ढिकले, तालुका संचालक हेमंत वाजे, राघू अहिरे, राजेंद्र नवले, अ‍ॅड. विलास गिते, निवृत्ती डावरे, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, गुलाबराव भामरे, सचिन पिंगळे, प्रशांत देवरे, त्र्यंबक दाते, एन. एस. पाटील, एस. के. शिंदे, दिलीप कुर्‍हाडे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची कामगिरी, कोरोना (corona) काळातील शैक्षणिक व्यवस्थापन (Educational Management) तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, गुणवत्ता (Educational development of students, quality) आदी गोष्टी प्रास्ताविकात मांडल्या. शालेय इमारत व पायाभरणी तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास (Educational development of students) व शाळेचा विकास-विस्तार या विषयी मविप्रचे तालुका संचालक हेमंत वाजे प्रास्ताविकात सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) बहुजनांच्या मुलांना शिकवण्यासाठी शाळा नव्हत्या.

मराठा विद्या प्रसारक समाजाने (Maratha Vidya Prasarak Samaj) ही संधी उपलब्ध करून दिली आणि या शाळांमधून आमची मुलं डॉक्टर (doctor), इंजिनीयर (Engineer) होऊन परदेशात गेली. यापुढेही असेच कार्य संस्था करेल, असा विश्वास निवृत्ती डावरे व्यक्त केला. मविप्र संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावर पोहोचत आहे. संस्थेचा विस्तार व गुणवत्ता यात आमूलाग्र बदल घडून आला. होरायझन हा आपल्या संस्थेचा ब्रँड बनला असल्याचे डॉ. शेवाळे म्हणाले. आभार सुनील ढिकले यांनी मानले. सूत्रसंचालन उपशिक्षिका पल्लवी गुजराथी, रेखा शिंदे यांनी केले.

यावेळी सभासद, स्थानिक व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, शिक्षक संघ, माजी विद्यार्थी संघ व विद्यार्थी उपस्थित होते. एस. जी. पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या स्मृतिपित्यार्थ निमाचे संचालक राजेश गडाख यांनी मविप्र संस्थेला एक लाखाचा धनादेश दिला. त्यामधून येणार्‍या वार्षिक व्याजाचे जे पैसे मिळतील त्यातून दहावी व बारावीतील मविप्र संस्थेतल्या तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थ्याला देण्यात यावे असे जाहिर करण्यात आले. यावेळी गडाख यांचा संस्थेच्यावतीने पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com