मविप्र सेवक सोसायटी निवडणुक; निवडणूक प्रचाराचा सोशल मीडियावर रणधुमाळी

मविप्र सेवक सोसायटी निवडणुक; निवडणूक प्रचाराचा सोशल मीडियावर रणधुमाळी

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (Nashik District Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) सेवक सोसायटीची (Sevak Society) निवडणूक (election) येत्या रविवारी दि.13 नोव्हेंबर रोजी होत असून

सध्या माध्यमिक शाळांना (shcool) सुट्टी असल्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये (Election campaign) या सुट्टयांमुळे निवडणूक (election) प्रचारात खोडा पडला असून बहुतांश उमेद्वारांना आता वैयक्तिक गाठीभेटीवर व सोशल मीडियावरच (social media) भर द्यावा लागत आहे.

माध्यमिक शाळा दि.9 नोव्हेंबर पासून सुरू होत असून खर्‍या अर्थाने मविप्र सेवक सोसायटीच्या उमेद्वारांना प्रचारासाठी चारच दिवसांचा वेळ मिळणार आहे. सध्या सीनियर कॉलेज (Senior College) सुरू असल्याने उमेद्वारांनी कॉलेज मध्ये जावून प्रचारावर भर दिला असला तरी मविप्र सेवक सोसायटी सदस्य (Member of MVP Sevak Society) संख्या जवळपास 3200 इतकी असली तरी सदस्य संख्या 1100 इतकी व माध्यमिक शाळांमधील 2100 च्या आसपास सभासद आहे. मात्र सुट्टयांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी व गावी ते गेले असल्याने उमेद्वारांना प्रचार करणे जिकरीचे बनले आहे.

मविप्र सेवक सोसायटीत सत्ताधारी समर्थ पॅनलचे नेतृत्व चेअरमन नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, सुप्रिया सोनवणे, राजेश शिंदे करत असून त्यांच्या विरोधात सेवक पॅनलचे मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ.बाळासाहेब पिंगळे, मविप्र सेवक संचालक डॉ.संजय शिंदे, शिक्षणाधिकारी सी.डी. शिंदे, सेवक संचालक निंबाळकर आदी करत असून प्रचाराने वेग घेतला आहे.

सत्ताधारी समर्थ पॅनलचा गट सोसायटीत आत्तापर्यंत केलेली कामे यावर भर देत असले तरी विरोधी सेवक पॅनल मात्र त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप प्रमाणात वाढले आहे. मविप्र सोसायटी महाराष्ट्रातील एकमेव सोसायटी असून तिच्या संस्थेमध्ये 100 टक्के वसुली, 7 टक्के दरानेे कर्ज वाटप व 7 टक्के दरानेच ठेव स्वीकारली जाते. तरी संस्थेला जवळपास 3 कोटी रुपये निव्वळ नफा होतो.

संस्थेचे खेळते भांडवल जवळपास 850 कोटी असून सभासदांना मार्चमध्ये ठेवी वरती व्याज व सप्टेंबर मध्ये शेअर्स वरती डिव्हिडंट दिला जातो. खर्‍या अर्थाने मविप्र सेवकांची ही अर्थवाहिनी आपल्या हातात रहावी यासाठी सत्ताधारी समर्थ पॅनल प्रयत्न करत असून या संस्थेचे नेतृत्व सेवानिवृत्त नेतृत्वाकडे न राहता सध्याचे जे संस्था सभासद आहे त्यांच्याकडे रहावी या दृष्टिकोनातून विरोधी सेवक पॅनल प्रयत्न करत आहे.

आता मात्र दोन्ही गटाने सत्ता रहावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र असे असले तरी 13 नोव्हेंबरला मविप्र सेवक सभासद कोणाच्या हाती सत्ता देतात याबाबत सेवकांमध्ये उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com