मविप्र निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांची माघार

मविप्र निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांची माघार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत ( Maratha Vidya Prasarak Samaj Shikshan Sanstha Election ) दाखल अर्जांतून काल पासून माघारीस सुरूवात झाली.पहिल्याच दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली.

उपाध्यक्षपदातून मनीषा पाटील,मालेगाव सदस्यातून साहेबराव हिरे, येवला तालुका सदस्यातून रायभान काळे, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन सेवक सदस्यातून संजय पवार यांनी माघार घेतली आहे.

एकूण 24 जागांसाठी 291 अर्ज पात्र ठरले होते. त्यातील चार जणांनी आज माघार घेतली. उद्या माघारी नंतर चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर साधारण तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होण्याचीच दाट शक्यता आहे. तिरंगी लढत झाल्यास मतांची विभागणी होईल. त्यामुळे मातब्बरांना विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com