मविप्र निवडणूक : माघारीचा आज अखेरचा दिवस

मविप्र निवडणूक : माघारीचा आज अखेरचा दिवस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ( MVP Elections )पंचवार्षिक निवडणुकीत दाखल अर्जांमधून पहिल्याच दिवशी चार तर दुसर्‍या दिवशी (दि.18) 19 अशा एकूण 23 उमेदवारांनी माघार घेतली.यात आमदार माणिकराव कोकाटे यांचाही समावेश असून त्यांनी सभापती पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र, त्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.माघारीसाठी शुक्रवारी (दि.19) अंतिम मुदत असून अंतिम चित्र स्पष्ट होईल.त्यामुळे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

आज (दि.18) दोन्ही पॅनल प्रमुखांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यातून इच्छुक उमेदवारांना काही तालुके वगळता उमेदवारीचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सहा पदाधिकार्‍यांपैकी दोन-तीन पदाधिकारीपदाचे उमेदवार निश्चित करण्याचे काम दोन्ही पॅनलकडून सुरु आहे. यातून शुक्रवारीच (दि.19) अंतिम उमेदवारी निश्चित होईल.

एकापेक्षा जास्त पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना कुठल्याही एका पदासाठी अर्ज कायम ठेऊन अन्य जागांचे अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. अन्यथा संबंधित उमेदवारांचे सर्व अर्ज बाद होणार आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडून अर्ज माघारीसाठी अखेरच्या दिवशी धावपळ उडणार,असे चित्र पहायला मिळणार आहे.

यांची माघार

अ‍ॅड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे (सभापती), मनिषा दामोधर पाटील (उपाध्यक्ष), डॉ. जयंत त्र्यंबकराव पवार (उपाध्यक्ष, उपसभापती व चिटणीस), विजय वामनराव कडलग (इगतपूरी तालुका सदस्य), मालेगाव तालुका सदस्य : साहेबराव गजानन हिरे, अरूण निंबा देवरे, अशोक जगन्नाथ निकम, सुधाकर बाबुराव निकम.येवला तालुका सदस्य : रायभान गंगाधर काळे, राजेंद्र विश्वनाथ शिंदे, सुनिल वसंतराव पाटील. नाशिक ग्रामीण सदस्य : जयराम तोलाजी शिंदे, मोहनराव पोपटराव पिंगळे, उच्च माध्य. व महाविद्यालयीन सेवक सदस्य : संजय सुकदेव पवार, दिलीप संपतराव माळोदे, दिलीप पुंडलिक पवार, प्राथमिक व माध्यमिक सेवक सदस्य : संगिता संजय डेर्ले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com