मविप्र पंचवार्षिक निवडणूक: कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी निवडून द्या : बोरस्ते

मविप्र पंचवार्षिक निवडणूक: कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी निवडून द्या : बोरस्ते

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण भागातील (rural area) तळागाळातील विद्यार्थ्यांना (students) शिक्षण (education) मिळावे, या उद्देशाने कर्मवीरांनी संस्थेची स्थापना केली.

निफाड तालुक्यातून (niphad taluka) कर्मवीर काकासाहेब वाघ (Karmaveer Kakasaheb Wagh), कर्मवीर अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे (Karmaveer Adv. Vitthalrao Hande), कर्मवीर दुलाजीनाना पाटील (Karmaveer Dulajinana Patil), डॉ. वसंतराव पवार (Dr. Vasantrao Pawar), मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले.

मविप्र संस्था (MVP) ही तालुक्याचे वैभव असून कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते (Manikrao Boraste) यांनी चांदोरी (chandori) येथे आयोजित प्रचार सभेत केले. अध्यक्षस्थानी जगन नाठे होते.व्यासपीठावर रामचंद्रबापू पाटील, यशवंतबापू अहिरे, श्रीरामजी शेटे, निलीमा पवार, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, मनोहर देवरे, माणिक शिंदे,

दिलीप मोरे, दत्ता गडाख, सुरेश कळमकर, प्रल्हाद गडाख, सिंधू आढाव, शंकरराव कोल्हे खेडेकर, डॉ. जयंत पवार, निवृत्ती टर्ले, दिलीप गडाख, शिवाजी खालकर, संतू खेलूकर, शिवाजी गडाख उपस्थित होते. नीलिमा पवार यांनी सध्याची लढाई ही वैचारिक असून आपण संस्थेचे काम हे देवकार्य समजून केले आहे.आरोग्य व शिक्षणासाठी काम करणे हे संस्थेचे कर्तव्य समजून समाजातील सर्व घटकांना सेवा मिळावी.

यासाठी करोना (corona) काळात जिल्ह्याभरात आठ तपासणी सेंटर (Inspection Center) उभारून दिलासा दिला. केटीएचएम महाविद्यालयाची (KTHM College) जागा ही कोणीही संस्थेला दिलेली नसून ती शासनाकडून नजराणा भरून मिळविलेली आहे. त्यासाठी काकासाहेब वाघ यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. विरोधकांनी संस्थेची प्रगती अगोदर समजावून घ्यावी मग बिनबुडाचे आरोप करावेत.

शेटे यांनी कर्मवीरांचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम नीलिमाताई व कार्यकारी मंडळाने केले असून शहरासोबतच ग्रामीण भागात देखील गुणवंत शिक्षण दिले जात असून जिल्हाभर सुबत्ता आणण्याचे काम झाले असल्याचे सांगितले. दिलीप मोरे, माणिक शिंदे यानीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व उमेदवार परिचय संदीप टर्ले यांनी तर आभार दत्ताकाका गडाख यांनी मानले. यावेळी चांदोरी येथील प्रचारकार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

जाधव यांचा पाठिंबा

सरचिटणीस पदासाठी उमेदवारी करणारे निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील नानासाहेब जाधव यांनी माघार घेत आपला पाठींबा प्रगती पॅनलच्या सरचिटणीस पदाच्या उमेदवार निलीमा पवार यांना आपला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com