बहुप्रतीक्षित 'मविप्र'ची निवडणूक जाहीर; अशी असेल निवडणूक प्रक्रिया

बहुप्रतीक्षित 'मविप्र'ची निवडणूक जाहीर; अशी असेल निवडणूक प्रक्रिया

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (NDMVP Education) पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम (Election Program Announced) जाहीर झाला आहे. शुक्रवार (दि.५) पासून उमेदवारी अर्ज (Application form) उपलब्ध होणार असून उमेदवारी अर्ज दि.७ ते ११ ऑगस्ट दरम्यान स्वीकारले जातील. दि.२८ ऑगस्टला मतदान, तर २९ ऑगस्टला मतमोजणी (Vote Counting) व निकाल जाहीर (Result Declared) केला जाणार आहे....

जिल्ह्यातील सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था (Education Institute) असलेल्या मविप्र संस्थेच्या (MVP) कार्यकारिणी मंडळाची मुदत ऑगस्टमध्ये संपते आहे. सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक (Election) होत आहे. शुक्रवार (दि.५) पासून उमेदवारी अर्जाची विक्री सुरू होणार आहे. मतदार याद्या, घटना व निवडणूक नियमावली निवडणूक मंडळ कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दि.१५ ऑगस्ट ही सार्वजनिक सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशी निवडणूक कार्यालयातील कामकाज सुरू राहणार आहे.

या संदर्भात रविवारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मविप्र निवडणुकीसाठी एक सदस्यीय लवादाची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ऍड.भास्करराव चौरे यांना संस्थेतर्फे नेमणूक पत्र देण्यात आले.

निवडणूक मंडळामध्ये सचिव म्हणून डॉ.डी.डी. काजळे (DD kajale) हे काम पाहणार आहे.तर सदस्य म्हणून ऍड. रामदास खांदवे, (Adv ramdas khandave) ऍड. महेश पाटील (Adv Mahesh Patil) हे त्यांना सहकार्य करतील. बैठकीस अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, (Dr Tushar Shewale) सरचिटणीस नीलिमा पवार (secretary Nilima Pawar), सभापती माणिकराव बोरस्ते व कार्यकारी मंडळ उपस्थित होते.

 • असा असेल कार्यक्रम

 • उमेदवारी अर्ज दिले जातील -५ ते ११ ऑगस्ट

 • उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत - ७ ते ११ ऑगस्ट

 • उमेदवारी अर्जाची छाननी - १२ ऑगस्ट

 • लवादाकडे अपिलाची मुदत - १३ व १४ ऑगस्ट

 • लवादाने निर्णय देण्याची मुदत - १६ ऑगस्ट

 • पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध - १६ ऑगस्ट

 • उमेदवारी मागे घेण्याची मुदत - १९ ऑगस्ट

 • उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी -१९ ऑगस्ट

 • उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप - १९ ऑगस्ट

 • मतदान - २८ ऑगस्ट

 • मतमोजणी व निकाल २९ ऑगस्ट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com