मविप्र संस्थेचा इतिहास प्रेरणादायी - शरद पवार

मविप्र संस्थेचा इतिहास प्रेरणादायी - शरद पवार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

'महाराष्ट्रात (Maharashtra) काही मोजक्या शिक्षणसंस्थांचा सामाजिक व शैक्षणिक इतिहास असून यामध्ये प्रामुख्याने मविप्र (MVP) व रयत (Rayat) संस्थेचा उल्लेख करावा लागेल. समाजातील मुलामुलींच्या भविष्याचा विचार करणाऱ्या व योगदान देणाऱ्या संस्था या कमी असून त्यांना मदत कण्याची नेहमी माझी भूमिका आहे....

मविप्र संस्थेचा (MVP) इतिहास हा प्रेरणादायक (Motivational) असून आजच्या तरुण पिढीसाठी तो निश्चितच मार्गदर्शक ठरेल. संस्थेच्या उभारणीसाठी जुन्या पिढीने दिलेले योगदान व कष्ट अत्यंत महत्वपूर्ण असून त्याची जाणीव आजच्या पिढीला होण्यासाठी त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी संस्थेचा इतिहास महत्वाचा असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या हस्ते मविप्र संस्थेच्या 'बखर' (bakhar) या इतिहासाच्या पहिल्या खंडाचे व कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पत्रांचा संच 'बोधामृत' (Bodhamrut) पुस्तकाचे प्रकाशन हॉटेल एमराल्ड पार्क येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ, आ.दिलीप बनकर,आ.सरोज अहिरे, हेमंत टकले, देविदास पिंगळे, संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार,अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना आहिरे, संचालक नानासाहेब महाले, भाऊसाहेब खातळे, दतात्रय पाटील,

उत्तमबाबा भालेराव, डॉ विश्राम निकम, डॉ प्रशांत देवरे, डॉ जयंत पवार, रायभान काळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, अशोक पवार, हेमंत वाजे, माजी उपसभापती अॅड पंडितराव पिंगळे, अभिमन्यू सूर्यवंशी, प्रा.अशोक सोनवणे, प्रा. बिरारी, शिक्षणाधिकारी डॉ एन एस पाटील, डॉ एस के शिंदे,सीमा जाधव इ. उपस्थित होते.

सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात 'कर्मवीर रावसाहेब थोरात साहित्यिक होते. त्यांनी केलेल्या लिखाणाच्या प्रेरणेतून सामाजिक भान असणारी पिढी तयार व्हावी अशी संस्थेची भावना होती.

तसेच संस्थेच्या कर्मवीरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संस्थेची उभारणी करून बहुजन समाजाच्या शिक्षणाची वाट निर्माण केली. कर्मवीर व समाजधुरीणांनी उभारलेले कार्य आजच्या पिढीला समजावे हा इतिहास प्रकाशनामागचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ दिलीप पवार यांनी तर आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी मानले. यावेळी इतिहास लेखन व पुस्तक निर्मितीमधील कार्याबाबत अभिमन्यू सूर्यवंशी, प्रा अशोक सोनवणे,प्रा.बिरारी व संस्थेतील कला शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com