मृतदेहाची परस्पर विल्हेवाट

मृतदेहाची परस्पर विल्हेवाट

सप्तशृंगगड, । वार्ताहर Saptshrungi Gad

येथे बेवारसस्थितीत मृत झालेल्या व्यक्तीची ग्रामपंचायतीने Grampanchayat- Saptshrungi Gad पोलिसात नोंद न करताच विल्हेवाट लावली. त्यामुळे गडावर ही घटना चर्चेचा विषय झाली होती.

सप्तशृंगगडावर शिवालय परिसरात Shivalay Area मंमादेवी चौकात हॉटेल व्यवसाय काम करणारे लक्ष्मण गायकवाड यांंच्या दुकानात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काम करत असणारे जळगाव येथील उत्तम मोतीराम कोळी वय अंदाजे 60 ते 65 राहणार भोलानगर आसोदा, या इसमाचा रात्री दुकानाबाहेर झोपलेला असताना मृत्यू झाला, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

ही घटना ग्रामपंचायतीला माहीत झाल्यानंतर मृतदेहाची ग्रामपंचायतीने माध्यमातून परस्पर विल्हेवाट लावायची घाई का केली, याबाबत पोलिसांना का कळवले नाही याबाबत संशय व्यक्त केला जात असून त्वरित ग्रामपंचायतीच्या कचरा वाहून येणार्‍या ट्रॅक्टरमधून त्या इसमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आले. मृतदेहाचा पंचनामा पोलिसांना बोलावून करण्यात आला नाही. तसेच मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात उतरिय तपासणीसाठीही पाठवला गेला नाही. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .

दरम्यान बेवारस व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नांदूरी येथील पोलिसांकडे झाली का, याची माहिती दूरध्वनीवरून विचारली असता त्यांनी याबाबत आमच्या दप्तरी कुठलीही नोंद नसल्याचे सांगितले. याबाबत कळवण पोलिस Kalwan Police station काय कारवाई करतात, याबाबत ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com