अग्निपथ योजनेत मुस्लीम युवकांचा सहभाग हवा: माजीसैनिक युनूस खान

अग्निपथ योजनेत मुस्लीम युवकांचा सहभाग हवा: माजीसैनिक युनूस खान

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

देशातील तरूणांनी भारतीय लष्कर (Indian Army), नौदल (Navy) व हवाई दलात (Air Force) भरती होण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्नशील राहिले पाहिजे. केंद्र सरकारने (central government) सुरू केलेली अग्निपथ योजना (Agneepath Yojana) तरूणांच्या फायद्याची आहे.

राजकीय मतभेदापलिकडे भारतीय लष्कराचे महत्व व उपयुक्तता कायम असल्याने अग्निपथ योजनेचा चार वर्षाचा रोजगाराचा कार्यकाळ तुमचे जीवन बदलू शकतो. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर देखील अनेक फायदे असल्याने मुस्लीम तरूणांनी (Muslim youth) अग्निपथ योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजीसैनिक कॅप्टन अब्दुल लतीफ (Ex-servicemen Captain Abdul Latif), युनूस खान (Yunus Khan) व जहीर अब्बास (Zaheer Abbas) यांनी येथे बोलतांना केले.

येथील एटीटी हायस्कुलच्या प्रांगणात केंद्र सरकारतर्फे (central government) सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजना व सैन्य भरती (Military recruitment) विषयी जनजागृती करण्यासाठी मालेगाव डेव्हलपमेंट फ्रंटतर्फे (Malegaon Development Front) आयोजित मेळाव्यात माजीसैनिक अब्दुल लतीफ, युनूस खान व जहीर अब्बास यांनी उपस्थित अल्पसंख्यांक समाज (Minority society) संस्थांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अग्निपथ योजना तुमच्या जीवनात बदल घडविणारी असल्याने मुस्लीम तरूणांनी जास्तीतजास्त संख्येने लष्करात सहभागी होवून आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन यावेळी माजीसैनिक जहीर अब्बास यांनी बोलतांना केले.

आपण 15 वेळा प्रयत्न केल्यानंतर लष्करात भरती झालो. सैन्यात भरती होण्यासाठी कठोर परिश्रम व सतत संघर्ष करावा लागतो याची माहिती देत अब्बास यांनी सैन्यदलाबद्दल असलेले गैरसमज दूर केले. आज देशातील तरूण व्यसन (Addiction), नैराश्य (Depression), तणावामुळे आत्महत्यासारखे कृत्य करत आहे. सुशिक्षित बेरोजगारीमुळे गैरव्यवहारात अडकत आहे. स्वार्थी राजकीय नेत्यांकडून तरूणांची दिशाभुल करून त्यांचा गैरवापर केला जातो. त्यामुळे दगडफेक 9

stone pelting), घोषणाबाजी अशा प्रकारापासून लांब राहत बेरोजगार युवकांनी अग्निपथ योजनेत समावेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी पुढे बोलतांना केले.

या मेळाव्यात मालेगाव विकास आघाडीतर्फे सैन्यात सहभागी होवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शारिरीक प्रशिक्षण व इतर माहिती देण्याची घोषणा केली. शहरात लवकरच ऑनलाईन नोंदणीसाठी चार केंद्रे व दोन प्रशिक्षण शिबीर सुरू होणार आहेत. यावेळी सेवानिवृत्त माजी सैनिकांनी तरूणांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इमरान राशीद यांनी तर आभार हबीबउर्र रहेमान यांनी मानले. कार्यक्रमात ऐतेशाम बेकरीवाला, इमरान रशीद, प्रा. वाशिस मुसा, प्रा. एस.एम. अन्सारी, साजीर मास्टर, नजीर खान, प्रा. हबीब आदींसह मोठ्या संख्येने विकास आघाडीचे पदाधिकारी व नागरीक सहभागी झाले होते.

अग्निवीर समितीची स्थापना

मालेगाव विकास आघाडीतर्फे अग्निवीर समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचे प्रमुख पद माजीसैनिक युनूस खान यांना देण्यात आले आहे. या समितीत प्रा. हबीबउर्र रहेमान, प्रा. वसिम मुसा, प्रा. एस.एन. अन्सारी, एजाज शाहीन, एहतेशाम बेकरीवाला, साबीर मास्तर, अब्दुल्ला अन्सारी, इमरान, रशीद आदी सदस्यांचा समावेश आहे. जास्तीतजास्त मुस्लीम तरूणांनी अग्निवीर योजनेत सहभागी व्हावे, यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com