पवित्र रमजान पर्वच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव सज्ज

मात्र यंदाही करोनाचे सावट - फारूक पठाण
पवित्र रमजान पर्वच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव सज्ज

धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा रमजानुल मुबारक महिन्याची सुरुवात येत्या दोन दिवसांनी होणार आहेत. या पवित्र पर्वच्या स्वागताची मुस्लिम समाजाने जोरदार तयारी सुरू केली असून समाजातील लहान मोठ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र यंदा ही करोनाचे सावट असल्यामुळे विशेष नमाज व ईदची नमाज ईदगाह मैदानावर पठण होणार का याबाबत संभ्रम आहे.️

रमजान महिन्याला इस्लाम धर्मात विशेष महत्व आहे. या महिन्यात पवित्र कुरआन शरीफ उतरविण्यात आला. तसेच याच महिन्यात रोजे फर्ज (अनिवार्य) करण्यात आले आहे. या पवित्र महिन्याला अल्लाहतआलाने ‘माझा महिना’ म्हणून संबोधित केलाय. या महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांच्या पाच रात्रीमधून एक रात्र अशी आहे.

ज्याचे महत्व हजार महिन्यांच्या तुलनेतही जास्त आहे. पैगंबर साहेब एका ठिकाणी म्हणतात, ‘जो व्यक्ति रमजानचे रोजे ठेवतो, आपली श्रध्दा व विश्‍वास मजबूत ठेवून प्रत्येक कर्तव्यांचंपालन करतो. त्याचे मागील सर्व पाप धुतले जातात. ‘रोजे’ ठेवतांना काही गोष्टींचे पालन प्रत्येक रोजे धारकाला करावे लागते. रोजामुळे अध्यात्मिक शक्ती वाढते. सहनशीलता वाढीस ‘रोजा’ फार उपयोगी ठरतो.

पहाटेपासून सुर्यास्तापर्यंत फक्त खान-पान न करणे, ‘रोजा’ नव्हे तर आपले प्रत्येक कर्म चांगले करून स्वतःला वाईट वृत्तीपासून दूर ठेवणेही रोजाचा महत्वपूर्ण भाग आहे. खोटेपणा, लबाडपणा, चोरी, त्रास देणे, धोका देणे इत्यादी कूकर्म केव्हाही करायला नकोत, तरीही वर्षाचे अकरा महिने हे कर्म चालत असतातच. रमजानमध्ये प्रत्येक मुस्लिम विशेषतः रोजाधारक अशा कूकर्मापासून फार दूर असतो.

विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा व चहा सारख्या न सुटणार्‍या सवयींपासून एक रोजाधारक कमीत कमी दिवसभर तरी दूर राहतो. ही फार मोठी गोष्ट आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की रोजामध्ये काहीच न खाणे व पिणे हा आपल्या शरीरावर एक प्रकारचा अत्याचार आहे परंतु हा पूर्णतः गैरसमज आहे. खरं म्हणजे विज्ञानानुसार सुध्दा रोजा ला अप्रत्यक्षरित्या शरीरासाठी किंवा मनुष्यासाठी फार उपयुक्त व फायदेशीर ठरवण्यात आलंय.

विज्ञानाच्या मते माणसाचे शरीर जेव्हा थकून जाते तेव्हा आपण त्याला विश्रांती घेतो. आपण झोपेत असतांना शरीराचे बह्यांग म्हणजे हात, पाय, पाठ, डोळे, कान, डोकं, मान या सर्वांना विश्रांती मिळते हे खरे, परंतु आपल्या शरीरातील आतील भाग विशेषतः पोटातील पचनेंद्रीय व त्याला सहायक अंगाना विश्रांती मिळत नसते. ते २४ तास आपले कार्य करत असतात. अशा परिस्थितीत आपल्या पचनेद्रियांना विश्रांती देणे फार गरजेचे आहे, असे विज्ञान म्हणतो यामुळे रोजाचे किती महत्व आहे. हे स्पष्ट होते.

इस्लाम धर्म प्रभावी जीवन मार्ग आहे. यात शंकाच नाही. परंतु या जीवनमार्गावर सर्व मुस्लिम चालतातच असे नाही. जो कोणी मुस्लिम काहीही करतो, तोच इस्लाम धर्म, हे समजणे अत्यंत चुकीचे कारण प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये काही दुष्ट व्यक्ती असतातच हे विसरून चालणार नाही. इस्लाम धर्म मानवता, सहिष्णुता, बंध्ाूभाव, देशप्रेम, सद्भावना, शांती आणि सभ्यतेची शिकवण देते. इस्लामध्ये पाच वेळाची नमाज अनिवार्य आहे.

पहाटेची दुपारची, संध्याकाळ पूर्वीची, सुर्यास्तानंतरची व रात्रीची या वेळांचे पालन ही आपली एक जीवनशैली तयार करते. यामुळे कोणाला हे शिकवायची गरज नसते की, सकाळी लवकर उठावे, आरोग्य चांगले राहते. तसेच नमाजाची प्रत्येक वेळ आपल्या जीवनाचा एक उत्तम वेळापत्रक तयार करते. आणि जीवन व्यवस्थित होतो.

शिवाय नमाजासाठी शरीराचे पावित्र्य हे महत्वाचे घटक. म्हणून आंघोळ करून शरीराची सफाई विशेष पध्दतीने हातपाय व तोंड धुणे अनिवार्य असते. याला ‘वजू’ म्हणतात स्वाभाविकपणे यामुळे आपण प्रत्येकवेळी स्वच्छ आणि पवित्र राहणार. जेणेकरून निरोगी जीवन जगण्यास आपल्याला मदत होते. शिवाय नमाज पठणामुळे आपल्यातील भेदभाव नाहीसे होतात. अहंकार कमी होऊन विनम्रता वाढते. प्रत्येक धर्मात दान करण्याला पुण्य मानतात.

इस्लाममध्ये दानधर्माला तर अनिवार्य केलेले आहे. ‘जकात’ इस्लाम मधील एक महत्वपूर्ण व अनिवार्य घटक. प्रत्येक सधन व्यक्तीला वर्षातून एकदा अडीच टक्के जकात गरीब, निर्धन व गरजूंसाठी देणे अनिवार्य आहे. जकात काढण्याची एक विशिष्ट परंतु अत्यंत सोपी पध्दत आहे. जकात या कर्तव्याला जर जगातील प्रत्येक माणूस योग्यरितीने व पूर्ण इमानदारीने पार पाडेल तर जगात प्रत्येक गरीब व गरजू व्यक्ती गरजू न राहता स्वावलंबी बनून जाईल.

आणि सधन व्यक्तिला त्याचा काहीही विररित परिणाम होणार नाही, हेही नक्की. रमजान महिन्यात मुस्लिम समुदाय नमाज, रोजा व जकात या इस्लामी आदेशांचे पालन करून आपले जीवन आनंददायी व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करून रमजाननंतर ही या आदेशाची अंमलबजावणी करून वाईट वृत्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com