वर्षभरापासून फरार संशयित जेरबंद

वर्षभरापासून फरार संशयित जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

हत्येच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या संशयिताला (Murder suspect) मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने साकोरी (ता. नांदगाव) येथून शिताफीने ताब्यात (Arrested) घेतले आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upanagar Police Station) हद्दीतील डीजीपीनगर, वडाळा रोडवर सिन्नरफाटा येथील बाबा शेख (Baba Sheikh) यास पिस्तुलने गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.

उपनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रमुख आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपींना पिस्तोल पुरवणारा सागर चंद्रकांत अहिरे (19, रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड, नाशिकरोड) हा हत्या झाल्यापासून फरार होता.

उपनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. मध्यवर्ती गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक माणिक गायकर, हवालदार श्रीराम सपकाळ, संजय गामणे, संदीप पवार, सचिन आजबे, मिलिंद बागुल यांना गोपनीय माहितीवरून व तांत्रिक विश्लेषण वरून हा संशयित नांदगाव तालुक्यातील साकोरी (Sakori) येथे असल्याची माहिती मिळाली.

उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त नवनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने साकोरी येथून सागर आहिरेला (Sagar Ahire) ताब्यात घेतले. उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. तब्बल एक वर्षापासून गुन्ह्यातील संशयिताला मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी पोलिसांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.