तब्बल ११ वर्षांनंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणारा फरार पती जेरबंद
तब्बल ११ वर्षांनंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल

नाशिक । Nashik

अकरा वर्षापूर्वी झालेल्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून फरार झालेल्या सशिंयत पतीस पोलीसांनी शिताफिने जेरबंद केले आहे.

काशीनाथ बाळू पवार (रा. चिंचओहळ, ता. त्र्यंबकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तब्बल 11 वर्षापूर्वी 11 ऑगस्ट 2010 मध्ये आडगाव शिवारात सैय्यद पिंप्री रस्त्यावर ही घटना घडली होती. या खूनाच्या प्रकरणात संशयिताबाबत पोलिस अनभिज्ञ होते. या गुन्ह्याच्या तपास करतांना गुन्हे शोध पथकाने संशयिताच्या मूळ गाव असलेल्या चिंचआहाळ येथून तपास सुरु केला.

गुन्हे शोध पथकाचे उत्तम खरपडे यांनी गावात दोन दिवस मुक्काम करीत, माहीती घेतली असता तेथे अनेक वर्षापासून तो गावाकडे फिरकला नसल्याची माहीती पुढे आली. त्यात काहीनी संशयित मृत झाली असावा अशी शक्यता पुढे आली. मात्र याच दरम्यान एकाने संशयित दिंडोरीत एका शेतावर मजूरी करीत असल्याची माहीती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटोही नसल्याने पोलिसांनी खून झालेल्या सैयद प्रिंपीरोडवर जाउन खून झालेल्या घटनास्थळापासून सुरुवात केली.

पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त सिताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, पोलीस नाईक नितीन जगताप,कुणाल पचलोरे, उत्तम खरपडे, नारायण गवळी आदीनी ही कामगिरी केली.

हे पोलीस पथक दिंडोरी परिसरातील वेगवेगळ्या भागातील मळयांमध्ये मागील दोन आठवडया पासुन तळ ठोकून शेतकरी शेतमजूरांकडे चौकशी करीत, संशयित काशीनाथ बाळू पवार याचा माग काढीत बनकर मळा, डंबाळवाडी ता.जि.नाशिक येथुन ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यास आणले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनी चौकशी केली असता, त्यात, संशयिताने 11 वर्षापूर्वी पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरुन लोखंडी फावडयाने खुन केला असल्याचे सांगितले व तेव्हापासुन कुणाच्याही संपर्कात न येता मिळेल तेथे 15 ते 20 दिवस दुसर्‍यांच्या शेतात मजूरी करून उपजिवीका करत असल्याचे सांगितले. मंगळवारी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सहा.पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे तपास करीत आहेत..

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com