मद्यधुंद पतीकडून पत्नीची हत्या

मद्यधुंद पतीकडून पत्नीची हत्या

पेठ | Peth

तालुक्यातील डोलारमाळ (Dolarmal) येथे घरगुती वादातून मद्यधुंद पतीकडून पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करुण खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे...

अधिक माहिती अशी की, डोलारमाळ येथील नामदेव यशवंत घाटाळ (Namdev Ghatal) याचे पत्नीशी भांडण झाल्याने मद्यधुंद नामदेव याने पत्नी जनाबाई हिस मारहाण करत असताना हातातील लाकडी दंडुक्याचा फटका डोक्यावर बसल्याने रक्तस्त्राव होऊन जनाबाईचा घरातच मृत्यू झाला.

याबाबतची माहिती पेठ पोलिसांना (Peth Police) मिळताच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड (Amol Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिवानसिंग वसावे, पोहवा शेखरे, एएसआय निलेश साळी, पोना गावीत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com