नाशकात दगडाने ठेचून एकाची हत्या

नाशकात दगडाने ठेचून एकाची हत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची घटना हिरावाडी रोडवरील (Hirawadi) दामोदरनगर (Damodarnagar) परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे...

सुनील त्र्यंबक कराटे (४५) (Sunil Karate) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हिरावाडी रोडवरील दामोदरनगर परिसरातील मनपा उद्यानाजवळ बुधवारी दुपारी सुनील कराटे यांची अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासात ही व्यक्ती पेंटर असून हिरावाडीत राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com