नाशकात तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

नाशकात तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) केल्याची घटना वडाळा रोडवरील शिवाजीवाडी (Shivajiwadi) झोपडपट्टीत घडली...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडाळा रोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टीत शनिवार (दि.२८) मध्यरात्रीच्या वेळी संशयित भरत भोये (Bharat Bhoye) याचे प्रेम प्रकरणातून वाद झाले.

या वादात मध्यस्थी करायला गेलेला सागर प्रकाश राऊतर (२०) याचा त्याला राग आल्याने भरतसह त्याचे चुलत भाऊ गौतम भोये, गणेश भोये यांनी सागर यास शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. सागरला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbainaka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा संशयितांना पोलिसांनी (Police) अटक (Arrest) केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com