किरकोळ वादातून तरुणाची हत्या; नाशिकमधील घटना

किरकोळ वादातून तरुणाची हत्या; नाशिकमधील घटना

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीतील कळसकरनगर (Kalasakarnagar) येथे चहा विक्री करणाऱ्या युवकाचा वडापाव आणि चहा स्वस्त का विकतो असे म्हणून बदनामी करीत असल्याच्या किरकोळ कुरापतीवरून मारहाण करीत चाकूने भोसकल्याची घटना घडली होती...

या घटनेत जखमी झालेल्या युवकाचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याने पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (दि २६) रोजी पावणेपाच वाजेच्या सुमारास तुषार रघुनाथ काळे (Tushar Kale) (वय ३४ रा. रो हाऊस न. २१ शिवपुष्पा सोसायटी, मानेनगर) हा युवक कळसकरनगर येथील मते मळा परिसरात चहाच्या टपरीवर चहा विक्री करीत होता.

संशयित आकाश मुन्ना काळे (Akash Kale) (रा. मते मळा,त्रिकोणी बंगल्याच्या पाठीमागे) हा तुषारच्या चहाच्या गाडीवर येऊन मी चहा आणि वडापाव कमी भावाने विकतो म्हणून माझी बदनामी का करतो.या कारणावरून कुरापत काढून तुषारला मारहाण करायला सुरुवात केली.

तसेच आपल्या सोबत आणलेल्या चाकूने तुषारवर वार करून गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने जखमी तुषारला खासगी रुग्णालयात (Private hospital) उपचारासाठी दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावीत, पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, उपनिरीक्षक बी. के. चतुर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करीत संशयित आकाश काळे याला ताब्यात घेत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

जखमी तुषार काळेवर उपचार सुरु असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याने संशयित आकाश काळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com