<p><strong>नाशिक l Nashik</strong></p><p>आनंदवल्ली भागात निर्जनस्थळी दोन मित्रांची पार्टी सुरु असताना जुनी भांडण काढून मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज मंगळवारी (दि. ०५) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.</p>.<p>आरोपी रुपेश छोटूलाल यादव (३६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) याने गुन्हा केल्याचे स्वत: कबुल केले आहे. यात त्याचा मित्र महेश विष्णू लायरे (२९, ररा. दत्तनगर, चुंचाळे) याचा जागीच मृत्यू झाला आहे.</p>