नवीन नाशिक । प्रतिनिधी
दत्त नगर परिसरातील एका घर मालकिणीचा खून करणाऱ्यांचा तपास अवघ्या एक तासात लावणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचा गौरव पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केला.
यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी , पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर , सपोनि गणेश शिंदे , पोउपनि राकेश शेवाळे , सपोउपनि शांताराम शेळके , पो.हवा संजीव जाधव, रविंद्र पानसरे, किरण गायकवाड, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर, जितेंद्र वजीरे , प्रशांत नागरे यांचे प्रशस्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांचेसह अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.