नाशकात दगडाने ठेचून एकाचा खून; पोलीस तपास सुरू

नाशकात दगडाने ठेचून एकाचा खून; पोलीस तपास सुरू
USER

नाशिक l प्रतिनिधी Nashik

म्हसरूळच्या खुनाची (Mhasrul Murder) घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी पौर्णिमा बस स्टॉप(paurnima bus stop) येथे पुण्याच्या एका व्यक्तीचा मृतदेह ठेचलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशकात खळबळ उडाली आहे...(murder in nashik pune road)

अधिक वृत्त असे की आज (दि.२०) पहाटे चार वाजेच्या सुमारास टोळक्याने नाशिक रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पौर्णिमा बस स्टॉप समोरच हरीश भास्कर पाटील (४४,रा. फ्लॅट नंबर 10, सुयश सहकारी संस्था, पश्चिमरंग सोसायटी जवळ, युनिव्हर्सल हाऊस जवळ, वारज जकात नाका पुणे) यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वपोनी साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता मयत पाटील यांना दगडाच्या सहाह्याने मारले असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून भद्रकाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com