फेसबुकवरील वादातून खून; तिघांना जन्मठेपेची क्षिक्षा

फेसबुकवरील वादातून खून; तिघांना जन्मठेपेची क्षिक्षा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

फेसबुक ( Facebook )वरून झालेल्या भांडणाची कुरापत काढून पाथर्डी फाटा येथील मुरलीधर नगर येथे एकाच्या खून प्रकरणी ( Murder Case )जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court )सबळ पुराव्यांमुळे तिघांना दोषी ठरवत जन्मठेप व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि ११ मे २०१५ रोजी आनंद संजय खणके (२१) यास फेसबुक वरून झलेल्या भांडणाची कुरापत काढून आरोपी योगेश उर्फ घाऱ्या राजेंद्र जाधव (२०,रा.जय मल्हार निवास,राजपूत कॉलनी,वडनेर दुमाला,ता.जि.नाशिक),सुमित संजय दिंडोरकर (२१,रा.गणेश चौक,नवीन नाशिक),राजरत्न उर्फ राष्ट्रपाल नरवाडे (२३,रा.राजगुरू निवास,आनंद नगर,पाथर्डी फाटा,नाशिक), तुषार उर्फ बंटी अनिल तायडे (२०) यांनी चाकूने वार करून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे ठार मारल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ( Indira Nagar Police Station )गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सपोनी आर.डी.गवळी यांनी करत संशयितांना विरोधात आरोप सिध्द होण्याच्या दृष्टीने सबळ पुरावे गोळा केले होते.सदर गुन्ह्याचा खटला जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक २ येथे सुरु होता.परिस्थितीजन्य पुराव्याला अनुसरून योगेश जाधव,सुमित दिन्डोरकर व राष्ट्रपाल नरवाडे यांना न्यायमूर्ती मृदुला व्ही.भाटीया यांनी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून दिपक्षीखा भिडे यांनी काम बघितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com