नाशकात एकाची डोक्यात दगड घालून हत्या

नाशकात एकाची डोक्यात दगड घालून हत्या

पंचवटी | वार्ताहर Panchvati

पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchvati Police Station) हद्दीतील पेठरोड वरील नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालया समोर मध्यरात्रीच्या सुमारास एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली....

राजेश शिंदे ( रा. भराडवाडी, फुलेंनगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे समजते.

पोलीस सूत्रानुसार, मध्यरात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास मयत राजेश शिंदे दुचाकीवरून घरी जात असताना पेठरोड येथील आर टी ओ कार्यालया समोरील रस्त्यावर अज्ञात काही हल्लेखोरांनी राजेश शिंदे यास अडवून डोक्यावर दगडाने घाव घातला.

यात शिंदेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

मयत राजेश शिंदे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असल्याचे समजते. त्याची हत्या कोणी व का केली याबाबत पोलीस माहिती घेत असून रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com