नाशिक | प्रतिनिधी

आनंदवल्ली परिसरातील गंगापूर रोडवर आज एकाची धारदार शस्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली असून तपास सुरु आहे.

रमेश मंडलिक असे हत्त्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. खून, प्राणघातक हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विनयभंग, लहान मोठे गुन्हे यांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

सिडकोमधील खुनाची घटना ताजी असतानाच आज अतिशय वर्दळीच्या ठिकाण तसेच नाशिक गंगापूर रोडवरच धारदार शस्राने एका व्यक्तीची खुलेआम हत्या करण्यात आल्यामुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे.