नाशकात २८ बटूंचे सामूहिक व्रतबंध

नाशकात २८ बटूंचे सामूहिक व्रतबंध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेच्या (Shukla Yajurvediya Brahmin Sanstha) यजुर्वेद मंदिरात 28 बटूंचा सामूहिक व्रतबंध (Munj) सोहळा पार पडला. या संस्कार कार्यक्रमाचे यंदाचे 43 वे वर्ष होते. कार्यक्रमात अलका कुकडे (Alka Kukade) आणि स्नेहलता शुक्ल (Snehalata Shukla) या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....

संस्कृत अभ्यासक रमेश देशमुख (Ramesh Deshmukh) व सरिता देशमुख (Sarita Deshmukh) यांच्या हस्ते निवृत्त आदर्श कार्यकर्त्यांना गौरवण्यात आले. यावेळी रमेश देशमुख कुटुंबीयांनी कै. दामोदर भिकाजी घोलप यांच्या स्मरणार्थ संस्थेला एक लाखाची देणगी दिली.

पौरोहित्य कौस्तुभ शौचे, माणिक शिंगणे, ऋषिकेश जोशी, दत्तात्रय भटमुळे, विनायक गायधनी, रवींद्र देव, उपेंद्र देव यांनी केले. कार्यक्रमास मानसी देशमुख, प्रशांत जुन्नरे, ॲड. व्ही आर गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष ॲड. भानुदास शौचे, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे, सहकार्यवाह राजन कुलकर्णी, रत्नप्रभा गर्गे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, सहकोषाध्यक्ष महेंद्र गायधनी, बांधकाम समितीचे दिलीप शुक्ल, धनंजय पुजारी, मंगल कार्यालय समितीचे प्रमोद मुळे, अवधूत कुलकर्णी, उदय जोशी, प्रकाश शुक्ल, अनिल नांदुर्डीकर, डॉ. शरद कुलकर्णी, संतोष भार्गवे, सतीश जोशी, संतोष भालेराव, ईशान जोशी, निखिल देशपांडे, सुभाष भणगे, सुहास भणगे, राजश्री शौचे, मोहिनी भगरे, रोहिणी जोशी, ऋत्विका शौचे, अनिता कुलकर्णी, शांता जाधव, गजानन जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.