मनपाला जाहिरातीतून मिळणार 'इतके' कोटी रुपये

पाच वर्षांसाठी चार हजार खांबांचा ठेका
मनपाला जाहिरातीतून मिळणार 'इतके' कोटी रुपये

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) जकात रद्द झाल्यानंतर एलबीटी ( LBT )सुरू झाली, यानंतर एलबीटीही रद्द होऊन जीएसटी लागू झाले. जीएसटी थेट महापालिका वसूल करत नाही तर ती केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत महापालिकांना दर महिन्याला ठरलेली रक्कम मिळते. विकास कामांसाठी महापालिकेला पैशांची गरज असल्यामुळे उत्पन्नाच्या नवीन स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने रस्त्यांवर लावण्यात आलेल्या 5022 खांबांपैकी ब वर्गाच्या चार हजार 100 खांबांवर जाहिरात लावण्याचा ठेका पाच वर्षासाठी देण्यात आला आहे. त्यापोटी महापालिकेला 4 कोटी 82 लाख 16 हजार रुपये मिळणार आहे.

यापूर्वी अ वर्गाच्या म्हणजे प्रमुख रस्त्यांवरील 922 खांबांवर जाहिरातीचा ठेका देण्यात आलेला आहे. दरम्यान ब वर्गाच्या म्हणजे मुख्य रस्त्याला जोड रस्ते असलेल्या 4100 खांबवर चार बाय सहा या साईजचे जाहिरात लावण्याचा ठेका देण्याची प्रक्रिया 2011 पासून सुरू होती, मात्र त्याला कोणीही बोली लावलेली नव्हती. आता त्याचा ठेका देण्यात आला आहे. आर. के. इंटरप्राईजेस या मक्तेदारांनी आगामी पाच वर्षासाठी प्रतीक खांब प्रति महिना 196 रुपये प्रमाणे ठेका घेतला आहे. सरकारी बोली 170 रुपये होती. तीन मतेदारांनी यासाठी बोली लावली होती. ठेकेदार दर महिन्याला एका खांबाचे 196 रुपये महापालिकेला देणार आहे . सध्या 5 वर्षासाठी हा ठेका महापालिकेने दिला असून दर दोन वर्षांनी त्याच्या भाड्यात वाढणार आहे.

नाशिक महापालिकेचे लहान-मोठे असे एकूण 5022 विद्युत खांब आहे .यात दोन प्रकारचे वर्ग करण्यात आले आहे. अ वर्गात 922 विद्युत खांब आहे तर ब वर्गात 4100 खांब आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेले खांब या अ वर्गात येतात, शहरातील सुमारे तीस मुख्य रस्त्यांवर हे खांब आहे तर ब वर्ग अंतर्गत रस्त्यांवर खांब आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने ठेका देण्याचे जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र ब वर्गासाठी पहिल्या टप्प्यात अपेक्षित बोली न लागल्यामुळे अ वर्गाच्या 922 खांब साठी ठेका देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com