'या' नाल्यांचे मनपा करणार सर्व्हेक्षण

'या' नाल्यांचे मनपा करणार सर्व्हेक्षण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर परिसरात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाल्यांच्या (natural drains) माध्यमातून पावसाचे पाणी (rain water) वाहून नेले जाते.

मात्र गेल्या काही वर्षात बांधकाम व्यवसायीकांच्या माध्यमातून नाले (drains) बूजवून त्या जागेचा वापर केला जात असल्याने पाण्याला दिशा देणारे नाले लयास चालले आहे. मनपा प्रशासनाने (Municipality administration) नोंदित 67 नाल्यांसह शहरातील पावसाळी पाणी (rain water) वाहून नेणार्‍या इतर नाल्याचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामाध्यमातून अतिक्रमणांवर (encroachments) कारवाई करण्यात येणार आहे.

शहर परिसरात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात (survey) 67 नाल्यांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या व्यतिरिक्तही बरेज नाले हे पावसाळी पाणी वाहून नेण्याचे काम करीत असतात. ते नोंदित नसल्याने बर्‍याच ठिकाणच्या नाल्यांवर अतिक्रमण (encroachment) होण्याचे प्रकार लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने 67 नाल्यांसह सर्वच नाल्यांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

नुकत्याच कर्मयोगीनगरात घडलेल्या नाल्याच्या काँक्रीटीकरणाच्या (concretization) प्रकारामुळे नागरीकांन नाराजी व्यक्त केली आहे. मनपा प्रशासनाने नाल्याच्या तळाला र्कांक्रिट करणे असंयुक्तिक असून, पावसाचे पाणी जमिनीत जात नसल्याने त्याचा विपरित परिणाम वॉटर टेबल (water table) खाली येण्यातून झाला आहे. पावसाचे पाणी जमिनीत मूरणे गरजेचे असून, त्याला अटकाव करणार्‍या बांधकाम व्यवसायीकावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com